Dharmendra Ikkis Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmendra Ikkis Film: 'वो इक्कीस का था...', धर्मेद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज, फोटो पाहून चाहते इमोशनल

Dharmendra Death: बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वी त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. धर्मेंद्र यांचा भावुक लूक पाहून चाहते खूपच इमोशनल झाले आहेत.

Priya More

Summary -

  • धर्मेंद्र यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वी त्यांच्या शेवटच्या ‘इक्कीस’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

  • पोस्टरमधील धर्मेंद्र यांचा गंभीर लूक पाहून चाहते भावुक

  • अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

  • धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ

बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन झाले. ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयातून बरे होऊन ते घरी आले होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेद्र यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड शोकसागरात बुडाले. धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त समोर येण्याच्या काही तासांपूर्वीच त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरवर असलेला धर्मेंद्र यांचा भावुक फोटो आणि त्यांचा आवाज ऐकून चाहते खूपच इमोशनल झाले आहेत. धर्मेंद्र यांच्या चित्रपटाचे हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'इक्कीस' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज पोस्टर रिलीज केले. जे काही मिनिटांत व्हायरल झाले आहे. एका पोस्टरमध्ये सुपरस्टार धर्मेंद्र खूपच गंभीर लूकमध्ये दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, वडील मुलाला वाढवतात, आणि महापुरूष देशाला वाढवतो. या चित्रपटामध्ये ही-मॅन २१ वर्षीय अमर जवानाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट ते पाहतील असे वाटत होते पण त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा धर्मेंद्र यांच्या 'इक्कीस' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता जयदीप अहलावत देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या धाडसाची आणि बलिदानाची झलक दाखवणारा या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या महिन्याच्या २९ तारखेला प्रदर्शित झाला होता.

अगस्त्य नंदा 'इक्कीस' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया देखील या चित्रपटात दिसणार आहे. सिमर भाटिया देखील या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. धर्मेंद्र यांचा हा चित्रपट यावर्षी २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि इंडिगो विमानाच्या पंखांची टक्कर

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

SCROLL FOR NEXT