Dhanush Idli Kadai Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Idli Kadai : 'साऊथ नाही तर, संपूर्ण देश...'; धनुषच्या 'इडली कडाई' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित, तारीखही आली समोर

Idli Kadai Release Date: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी 'इडली कडाई' चित्रपटाच्या नवीन तारखेची घोषणा केली आहे. बॉक्स ऑफिस प्रॉब्लेम्समुळे आधीच रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

Shruti Vilas Kadam

Dhanush Idli Kadai Movie: प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि दिग्दर्शक धनुषच्या आगामी चित्रपट 'इडली कडई' ची चाहते मोठ्या उत्साहात वाट पाहत आहेत. मूळतः हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणांमुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. नवीन माहितीनुसार, 'इडली कडई' हा चित्रपट आता १ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ​

धनुषने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचा नवीन पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची नविन तारिख जाहीर केली आहे. या घोषणेनंतर चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्याने लिहीले, धनुष सर या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा, आणखी एकाने लिहीले, साऊथ नाही तर, संपूर्ण देश तुमच्या चित्रपटाची वाट पाहत आहे.

'इडली कडई' हा धनुषचा चौथा दिग्दर्शित चित्रपट असून, त्याने स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात निथ्या मेनन, अरुण विजय, शालिनी पांडे, प्रकाश राज, पी. समुथिरकणी आणि राजकिरण यांसारखे प्रतिभावान कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ​

चित्रपटाची निर्मिती वंडरबार फिल्म्स आणि डॉन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी केले असून, छायांकन किरण कौशिक यांनी सांभाळले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबर २०२४ मध्ये थेनई जिल्ह्यातील गावांमध्ये सुरू झाले होते आणि मार्च २०२५ पर्यंत बहुतांश चित्रीकरण पूर्ण झाले होते. ​

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT