Dhanshree Verma google
मनोरंजन बातम्या

Dhanashree Verma: 'मी खूप भावुक झाले आहे'... घटस्फोटाच्या चर्चादरम्यान धनश्री वर्माचा सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

Dhanshree Verma Yuzvendra Chahal Divorce Rumours Emotional Video Viral: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना, धनश्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा गेल्या काही महिन्यांपासून आपल्या घटास्फोटामुळे चर्चेत आहे. अलीकडे, घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, युजवेंद्र चहल चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आरजे महवशसोबत दिसला होता. तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी जोर धरला. काही दिसावसांपूर्वी धनश्रीने सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट केली होती. त्यातच धनश्री वर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये धनश्री खूप भावूक झालेली दिसत आहे. पापराजीने विचारले असता, धनश्री म्हणाली, मी खूप भावुक झाले आहे.

धनश्री का भावूक झाली?

बुधवारी बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री नोरा फतेही यांचा 'बी हॅप्पी' चित्रपटाच्या प्रीमियरचे आयोजन केले होते. रेमो डिसूझा दिग्दर्शित हा एक नृत्य म्हणजेच डान्सवर आधारित चित्रपट आहे. हा सिनेमा १४ मार्च ला ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेजॅान प्राइम वर रिलीज होणार आहे. धनश्रीने देखील या सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. धनश्री जेव्हा चित्रपट पाहून बाहेर आली तेव्हा ती खूप भावुक झाली होती.

धनश्रीचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. जेव्हा ती चित्रपट पाहून बाहेर आली तेव्हा पापराझीने तिला घेरले. पॅप्सने तिला विचारले, की चित्रपट कसा होता? त्यावर ती म्हणाली चित्रपट खूप चांगला होता... मी खूप भावुक झाले आहे. अर्थातच धनश्री वर्मा चित्रपट पाहिल्यानंतर भावुक झाली होती. परंतु नेटकऱ्यांनी तिच्या या विधानांवर तिला ट्रोल केले आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे नातं

मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मी घटस्फोट घेत आहेत. गेल्या महिन्यात,एबीपी न्यूजच्या एका वृत्तात दावा करण्यात आला होता की, कोर्टाच्या सुनावणीदरम्यान युजवेंद्र आणि धनश्री गेल्या १८ महिन्यापासून वेगळे राहत असल्याचे उघड केले होते. त्यांनी सांगितले की, आमच्यात कम्पॅटिबिलिटी म्हणजेच सुसंगता नाही म्हणून आम्ही घटस्फोट घेत आहोत. दोघांनी पाच वर्षापूर्वी आपल्या कुटुबांच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केले होते.

धनश्री वर्माने सोशल मीडियावर शेअर केली गूढ पोस्ट

चॅम्पियन्स टॅॉफीच्या फायनलदरम्यान क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक गूढ पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने लिहिले होते की, 'महिलांना दोष देणे हे नेहमीच फॅशनमध्ये असते'. तिने ही पोस्ट कोणासाठी लिहिली होती हे उघड केले नसले तरी, नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला की ही पोस्ट युजवेंद्रसोबतच्या घटास्फोटाशी संबधित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT