Devara First Review  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Devara First Review : ॲक्शनचा धमाका, पैसा वसूल सिनेमा, Jr NTR च्या 'देवरा पार्ट 1' चा पहिला रिव्यू

Shreya Maskar

ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा पार्ट 1' (Devara: Part 1) चित्रपट 27 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग देखील खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये खूप मोठी कमाई केली आहे.

चित्रपटाला काही तास उरलेले असताना नेटिझन्सनी या चित्रपटाचे रिव्ह्यू शेअर केले आहेत. नेटिझन्सनच्या मते हा चित्रपट ॲक्शनचा धमाका आहे. चित्रपटातील ॲक्शन सीन्सचे अनेकांनी कौतुक केले आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरने (Jr.N. T. Rama Rao ) चमकदार कामगिरी केली आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, जबरदस्त एक्शन सीक्वेंस आणि पावरफुल परफॉर्मेंस तसेच 'विजुअल स्पेक्टेकल' असे म्हटले आहे. अनेकांना हा चित्रपट पैसा वसूल वाटत आहे. एका यूजरने लिहिलं की, हा चित्रपट असाधारण आहे. शानदार अभिनय पाहायला मिळत आहे. एक सीन सुद्धा मिस करावासा वाटत नाही. चित्रपटात वेगळीच पावर आहे. सैफ अली खानची भूमिका धमाकेदार आहे. 'देवरा' चित्रपट पैसा वसूल आहे. असे बोलून त्यांनी 3.5/5 रेटिंग दिली आहे.

कोराताला शिवा दिग्दर्शित'देवरा पार्ट 1' पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. यात ज्युनियर एनटीआरचा डबल रोल पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात जाह्नवी कपूर आणि सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात सैफ अली खानने मुख्य खलनायक भूमिका साकारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : निवडणुकांआधी निर्णयाचा पाऊस ! अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर

IND vs BAN 2nd Test: भारत - बांगलादेश कसोटीत चौथ्या दिवशी सॉलिड ट्विस्ट; उद्या थेट रीझल्ट लागणार

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 'एक पाऊल पुढे', बड्या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, वाचा

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर

Virat Kohli Record: विक्रमादित्य विराट कोहली! असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच भारतीय फलंदाज

SCROLL FOR NEXT