Deool Band 2 Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Deool Band 2: पाच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; तिसरा मराठी चित्रपट जाणार शंभर कोटींच्या पार

Deool Band 2: प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाने ९८ कोटींचा टप्पा पार केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा विक्रम ठरला आहे.

Shruti Vilas Kadam

Deool Band 2: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २'ची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शनानंतर सलग पाचव्या आठवड्यातही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम असून, या सिनेमाने आता तब्बल ९८ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

'देऊळ बंद २' हा २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद'चा पुढचा भाग आहे. आध्यात्मिक आणि शेतकऱ्यांचा विषय मांडत प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट साकारला आहे. चित्रपटातील कथानक, संवाद आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ग्रामीण भागासह शहरांमध्येही या सिनेमाला मोठी पसंती मिळत आहे. प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे चित्रपटाने पहिल्या आठवड्यापासूनच बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवली आहे.

चित्रपटात स्नेहल तरडे, मोहन जोशी, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, ओम भुतकर यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 'स्वामी' भक्तांसह सर्वसामान्य प्रेक्षकांनीही चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाच्या यशानंतर प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत हे यश सहज मिळाले नसल्याचे सांगितले. प्रेक्षकांचे प्रेम, टीमचे परिश्रम आणि 'स्वामींचा आशीर्वाद' यामुळे हा प्रवास शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

 'सैराट' आणि 'राजा शिवाजी' या मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केल्यानंतर आता 'देऊळ बंद २' या १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा चित्रपट ठरेल. यापूर्वी ५० कोटी आणि ९० कोटींचे टप्पेही वेगाने पार केले होते. आता ९८ कोटींचा आकडा ओलांडल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा विक्रम नोंदवण्याच्या दिशेने हा सिनेमा वाटचाल करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात खळबळ! भाजपच्या नेत्यावर अहिल्यानगरमध्ये जमावाचा जीवघेणा हल्ला; १०० जणांवर गुन्हा दाखल

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यावर कायदेशीर कार्यवाही करणार

Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले

Crime News: मैत्रीच्या धाग्याला रक्ताचा डाग! मित्रांमधील वादातून २७ वर्षीय तरुणाचा खून

Sugar Rates : रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड! साखरेच्या दरात घसरण, १ किलोचे आजचे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT