Kangana Ranaut Emergency Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Emergency Movie: 'इमर्जन्सी'वर बंदी घालण्याची मागणी, कोर्टात झाली सुनावणी; काय म्हणाले सेन्सॉर बोर्ड?

Kangana Ranaut Emergency Movie : कंगना राणौत यांच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली.

Satish Kengar

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. यादरम्यान सेन्सॉर बोर्डाने न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, या चित्रपटाला अद्याप प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही. चित्रपटाविरोधात अनेक तक्रारी आहेत. तक्रारी ऐकून घेऊनच चित्रपटाला प्रमाणपत्र दिले जाईल.

यातच कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाला पंजाबमध्ये मोठा विरोध होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याशिवाय शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनेही कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

वकील इमान सिंग खारा यांनी दाखल केली याचिका

कंगना यांचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट 6 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र आता सेन्सॉर बोर्डाने न्यायालयात आपलं म्हणणं मांडल्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन रखडण्याची शक्यता आहे. इमर्जन्सी चित्रपटाच्या विरोधात वकील इमान सिंग खारा यांनी याचिका दाखल केली होती. ज्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

यासंदर्भात शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सदस्य गुरचरण सिंग ग्रेवाल यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ते म्हणाले की, ''शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिले आहे. यामध्ये कंगना राणौत या असल्यामुळे या चित्रपटाला विरोध होत नसून इमर्जन्सी या चित्रपटात शीख धर्मीयांना चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे.''

ते म्हणाले, ''हे शीख समाजाविरुद्धचे षड्यंत्र आहे. आता जर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नका, असे म्हटले असेल तर ते खूप चांगले पाऊल आहे. ही बाब केवळ शीख धर्मीयांशी संबंधित नाही, तर संपूर्ण देशातील सलोख्याच्या चिंतेशीही संबंधित आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT