'पांडू' सिनेमाच्या कलाकारांवरती गुन्हे दाखल करण्याची रिपाइंची मागणी SaamTV
मनोरंजन बातम्या

'पांडू' सिनेमाच्या कलाकारांवरती गुन्हे दाखल करण्याची रिपाइंची मागणी

सध्या राज्यभरात पांडू या मराठी चित्रपटाच्या (Pandu Marathi movie) निमित्ताने या चित्रपटाची टीम विविध थिएटरमध्ये जाऊन भेट देत आहेत. प्रेकषकांना त्यांचा चित्रपट पाहण्याचं आवाहन करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : सध्या राज्यभरात पांडू या मराठी चित्रपटाच्या (Pandu Marathi movie) निमित्ताने या चित्रपटाची टीम विविध थिएटरमध्ये जाऊन भेट देत आहेत. प्रेकषकांना त्यांचा चित्रपट पाहण्याचं आवाहन करत आहेत. मात्र हे करत असताना त्यांनी काही नियम मोडल्याचा आरोप रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केला आहे.

हे देखील पहा -

पांडू सिनेमाचा (Movie) पहिला शो ठाण्यामधील विवियाना मॉलमध्ये पार पडला असताना पांडू मधील कलाकारांनी कोरोनाचे (Corona) कोणतेही नियम (Corona Rules) पाळले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी इंदिसे यांनी केली आहे. शिवाय याबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी वर्तक नगर पोलिसांना निवेदन देत केली आहे.

याबाबत इंदिसे यांनी मिडीयाशी बोलतना सांगितलं की, सर्वसामान्य नागरिकांनी जर कोरोना नियमांच उल्लघंन केलं तर त्यांच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो. मग या कलाकारांसाठी वेगळा नियम आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये शुक्रवारी 'पांडू' सिनेमाचा पहिला शो झाला. यावेळी भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, कुशल बद्रीके, प्राजक्ता माळी, (Bhau Kadam, Sonali Kulkarni, Kushal Badrike, Prajakta Mali,) यांच्यासह अन्य कलाकारांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र यावेळी एकाही कलाकाराने मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगच (Social Distance) पालन केले नाही. शिवाय मॉलमध्ये जाण्यासाठी दोन लसीचे (Vaccination) दोन्ही डोस घेणे सक्तीचे असताना देखील एकाही कलाकारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली नसल्याचा दावाही भैय्यासाहेब इंदिसे यांनी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT