Deepika Padukone Attend the Cartier Event
Deepika Padukone Attend the Cartier Event Saam Tv
मनोरंजन बातम्या

दीपिका पदुकोणला 'या' अवतारात बघून फॅन्सची उडाली झोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कान्स चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आता कार्टियर इव्हेंटसाठी स्पेनला रवाना झाली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण जगभरात आपलं नाव कमावलेल्या दीपिका पदुकोणने बुधवारी स्पेनच्या माद्रिदमध्ये कार्टियरच्या ब्युटीज डू मोंडे हाय-एंड ज्वेलरी कलेक्शनच्या लॉन्चचे फोटो शेअर केले आहेत. जिथे ती कार्टियरची ब्रँड अॅम्बेसेडर रमी मलेक, यास्मिन साबरी आणि अॅनाबेले वालिस यांच्यासोबत दिसली.

या इव्हेंटसाठी दीपिका पदुकोणने पांढऱ्या रंगाचा सिल्कचा आयवरी गाउन परिधान केला होता. जो लंडनमधील(Fashion) फॅशन डिझायनर मन्सूरीयाने डिझाइन केला आहे. दीपिका पदुकोण या ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत होती. चाहतेही दीपिकाच्या या लूकचे कौतुक करताना थकत नाही आहेत. या गाऊनसोबत दीपिकाने डायमंड नेकलेस आणि मॅचिंग कानातले घातले होते.

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना दीपिका पदुकोणने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एका सुंदर, प्रेरणादायी संध्याकाळसाठी धन्यवाद कार्टियर'. दीपिकाच्या हेअरस्टाइलबद्दल सांगायचे तर, दीपिकाने सॉफ्ट वेव्हजसह केसांचा एक बन बनवला होता, जो तिच्यावर खूपच सुंदर दिसत होता.

दीपिका पदुकोणने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यापासून हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दीपिकाचा ग्लॅमरस लूक बघायला मिळत आहे. दीपिकाच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीही तिच्या या लूकचं कौतुक करत आहेत. दीपिकाने या लूकने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : नोकरीत मराठी माणूस नको! का? संताप-राग-खंत... मराठी तरूणांच्या भावना आल्या उफाळून

Yashwant Killedar MNS | मनसे आणि ठाकरे गट शिवाजी पार्क कुणाला?

SCROLL FOR NEXT