Deepika Padukone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिका पदुकोणचा नवा रेकॉर्ड; 10,000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारी पहिली अभिनेत्री ठरणार

Deepika Padukone Biggest Record In Indian Cinema: दीपिका पादुकोणने जगभरात तिच्या कामाचा ठसा उमटवलाय. दीपिका पादुकोण 10,000 करोडच्या वर्ल्ड वाइड क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे.

Manasvi Choudhary

दीपिका पादुकोण हे इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे. दीपिकाने अनेक चित्रपटातून आव्हानात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अशातच अभिनेत्री आता लवकरच आई होणार आहे. सध्या दीपिका तिची प्रेग्नसी एन्जॉय करत आहे. नुकताच दीपिकाने नवा रेकॉर्ड केला आहे.

दीपिका पादुकोणने जगभरात तिच्या कामाचा ठसा उमटवलाय. दीपिका पादुकोण 10,000 करोडच्या वर्ल्ड वाइड क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे. आतापर्यत दीपिकाच्या 29 चित्रपटांनी जगभरात 9,808 करोडची कमाई केली आहे.

दीपिकाने 2007 मध्ये 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मागील अठरा वर्षाच्या काळात दीपिकाने दमदार कामगिरी केली आहे. इंडस्ट्रीमध्ये यशस्वी अभिनेत्रीमध्ये दीपिकाच्या नावाचा समावेश केला जातो .

दीपिका पादुकोणच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. नुकताच रिलीज झालेल्या दीपिकाच्या 'कल्की' या चित्रपटाने 1,055 कोटींची कमाई केली आहे. तर 'जवान' 1,143, 'पठाण' 1,060, 'ए दिल है मुश्किल' 318 कोटी 'बाजीराव मस्तानी' 367 कोटी हे चित्रपट आहेत. दीपिकाच्या हॉलिवूड "ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ झेंडर केज" चित्रपटाने जगभरात 2,300 कोटींची कमाईल केली . दीपिकाच्या एकूण चित्रपटाची कमाई पाहता लवकरच 10,000 कोटींचा टप्पा गाठणार असल्याचं दिसत आहे.

दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचं तर, दीपिका आगामी काळात रोहित शेट्टीसोबत 'सिंघम अगेन' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दिपीका पोलिस अधिकारीच्या भूमिकेत झळकणार आहे. सिंघम अगेन हा चित्रपट जगभरात 200 कोटींचा विक्रम करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT