Dated 100 boys, still can't find boyfriend; Listen to Miss Great Britain anguish Instagram/@aprilbanbury
मनोरंजन बातम्या

कुणी बॉयफ्रेंड देतं का? 100 मुलांना केलं डेट, तरीही मिळाला नाही बॉयफ्रेंड; ऐका मिस ग्रेट ब्रिटनची व्यथा

April Banbury: एप्रिल बनबरी नावाची मॉडेल 2020 मध्ये मिस ग्रेट ब्रिटन बनली. त्याच वेळी, ती किशोरवयात असताना, तिला एनोरेक्सिया या आजाराशी सामना करावा लागला. ती वेडींग ड्रेस डिझायनर आहे.

साम टिव्ही

बॉयफ्रेंड न मिळण ही सामान्य बाब आहे. पण, मिस ग्रेट ब्रिटन असूनही बॉयफ्रेंड न मिळणं हे न पचन्यासारखंच आहे. २०२० मध्ये मिस ग्रेट-ब्रिटनचा खिताब पटकावणारी एप्रिल बनबरी (april banbury) या मॉडेलने आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना डेट केले आहे. मात्र आजपर्यंत तिला तिच्या मनासारखा एकही प्रियकर सापडलेला नाही. बनबरी ही पेशाने मॉडेल आणि वेडिंग ड्रेस डिझायनर आहे, त्यामुळे ती अनेक नववधूंनी भेटत असते. जेव्हा तिला कुणी विचारतं की, तू लग्न का केलं नाहीस? पण यावर एप्रिलचे उत्तर 'आता नाही...' (Dated 100 boys, still can't find boyfriend; Listen to Miss Great Britain anguish)

हे देखील पहा -

'द सन'च्या रिपोर्टनुसार, एप्रिलने आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना डेट केलं आहे. तिने सांगितले की, जेव्हा ती बाहेर जाते तेव्हा तिच्याशी बोलण्याठी कुणीतरी उत्सुक आहे असं फार कधीतरी होतं, त्यामुळे अशा परिस्थितीत बॉयफ्रेंड शोधण्यासाठी तिने आता डेटिंग ॲपचाही सहारा घेत आहे.

एप्रिलने तिच्या अनेक डेटींग्सबाबत अनेक किस्से शेअर केले आहेत. ती म्हणते गेल्या वर्षी मी आतुरतेने खऱ्या प्रेमाचा शोध घेत होते. एक व्यक्ती तिच्या संपर्कात आली, ज्याच्याशी ती फोनवर बोलत होती, मात्र दोघे भेटल्यानंतर तिने त्याचा नंबरही ब्लॉक केला. दुसऱ्या व्यक्तीने तिला डिनरसाठी बोलावले पण, तिथे बिल तिनेच भरावे अशी त्याची इच्छा होती त्यामुळे एप्रिलने डेट अर्ध्यातच सोडली. एकंदरीत असे अनेक किस्से तिच्या सोबत होते, जिथे ती डेट अर्ध्यावरच सोडून निघून गेली.

ती अजूनही तिच्या खऱ्या प्रेमाचा शोध घेत आहे, परंतु ती म्हणते की तिला याबद्दल फारशी चिंता नाही. कारण तो त्याच्या करिअरच्या सर्वोत्तम टप्प्यावर आहे. तिने सलग दुसऱ्या वर्षी मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी नॅशनल कॉस्‍ट्यूम तयार केला आहे. गेल्या वर्षी तिने मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये मिस वेल्ससाठी ड्रेस डिझाइन केला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT