Dashavatar Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dashavatar Collection : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार 10 कोटींचा टप्पा

Dashavatar Box Office Collection Day 6 : दिलीप प्रभावळकर यांचा 'दशावतार' रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बंपर कमाई केली आहे. एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'दशावतार' 12 सप्टेंबरला रिलीज झाला.

'दशावतार' चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

'दशावतार' लवकरच 10 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.

सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' (Dashavatar) चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. प्रेक्षक ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar ) यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. 'दशावतार' ही कोकणातील एक परंपरा आणि लोककला आहे. 'दशावतार' चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज झाला. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे.

'दशावतार' चित्रपटाने त्याच्या सोबत रिलीज झालेल्या 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे. 'दशावतार' चित्रपटाचे कौतुक मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडमधील कलाकारही करत आहे. 'दशावतार' चित्रपट आता लवकरच 10 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 58 लाख रुपयांची कमाई केली. मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी सहाव्या दिवशी 1.35 कोटी रुपये कमावले. चित्रपटाने आतापर्यंत 9.45 कोटींच्यावर कमाई केली आहे.

'दशावतार' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

  • दिवस पहिला - 58 लाख रुपये

  • दिवस दुसरा - 1.39 कोटी रुपये

  • दिवस तिसरा - 2.4 कोटी रुपये

  • दिवस चौथा - 1.01 कोटी रुपये

  • दिवस पाचवा - 1.3 कोटी रुपये

  • दिवस सहावा - 1.35 कोटी रुपये

'दशावतार' स्टार कास्ट

'दशावतार' चित्रपटात मुख्य भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर झळकले असून त्यांच्यासोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर, रवी काळे, सुनील तावडे आणि विजय केंकरे या कलाकारांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्न सराईची लगबग अन् क्षणात अनर्थ घडलं; गॅस सिलिंडरचा स्फोट, टाकीचे तुकडे उडाले, ११ जण जखमी

Success Story : कोरडवाहू शेतकर्‍याचा मुलगा झाला अधिकारी! MPSC मध्ये महाराष्ट्रात टॉप १० मध्ये, अख्खा गावात जल्लोष

CM Devendra Fadnavis: रखडलेल्या प्रकल्पांवरुन मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर संताप; शांत, संयमी फडणवीसांचा रुद्रावतार

Bhagavad Gita: तुम्हाला क्रोध येण्याचं खरं कारण माहितीये का? श्रीकृष्णांचं भगवद्‌गीतेतील गूढ उत्तर जाणून घ्या

Maharashtra Live News Update: निलेश घायवळवर आणखी एक मोक्का, तरुणावर केला होता कोयत्याने हल्ला

SCROLL FOR NEXT