Zaira Wasim SAAM TV
मनोरंजन बातम्या

Zaira Wasim : 'दंगल गर्ल'नं गुपचूप उरकलं लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

Zaira Wasim Wedding : आमिर खानसोबत काम केलेली अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shreya Maskar

'दंगल गर्ल' जायरा वसीमने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.

जायरा वसीमने 'दंगल' चित्रपटात आमिर खानसोबत काम केले आहे.

जायरा वसीमने आपल्या निकाहाचे फोटो शेअर केले आहेत.

'दंगल गर्ल'ने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. आमिर खानसोबत काम करणाऱ्या जायरा वसीमने (Zaira Wasim) गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. यासंबंधित खास पोस्ट करून तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 'दंगल गर्ल'ने निकाह केला आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे.

जायरा वसीमने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये जायरा निकाह कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. तर चंद्राकडे पाहत नवऱ्यासोबतचा पाठमोरा उभा असलेला फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोंना तिने हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "Qubool hai x3" फोटोंमध्ये जायरा वसीम नववधूच्या रुपात दिसत आहे. सध्या कलाकार मंडळी आणि तिचे चाहते तिच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 2019 साली जायरा वसीमने मनोरंजन विश्वाला रामराम ठोकला. 25व्या वाढदिवसाआधी जायरा वसीम लग्नबंधनात अडकली आहे. जायरा वसीमने लग्नाला सुंदर लाल रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. त्यावर गोल्डन वर्क पाहायला मिळाले. तर जायराच्या नवऱ्याने ऑफ-व्हाइट रंगाचा कुर्ता परिधान केला.

वर्कफ्रंट

जायरा वसीमने 2016 मध्ये आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून पदार्पण केले. तिचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला. तिला पुरस्काने सन्मानित देखील करण्यात आले. त्यानंतर ती 2017 साली 'सीक्रेट सुपरस्टार' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने प्रियांका चोप्रासोबत 'द स्काई इज पिंक'मध्ये काम केले. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

Jabrata: टीव्हीची प्रसिद्ध जोडी मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, रिलीज डेट काय?

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार

आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

Surupsingh Naik Passes Away: आदिवासी युवकांचा आधारस्तंभ हरपला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

SCROLL FOR NEXT