Gautami Patil New Film Ghungaru Official Teaser
Gautami Patil New Film Ghungaru Official Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil New Film: गौतमीचं पुन्हा नशीब पालटलं; लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्षित...

Chetan Bodke

Ghungaru Official Teaser: ‘सबसे कातील गौतमी पाटील’ या वाक्याने अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली गौतमी नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. गौतमीच्या डान्सवर आणि तिच्या अदांवर चाहते फिदा आहेत. आपल्या सौंदर्याने महाराष्ट्रातल्या तरुणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीचं सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे. तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत असताना, लवकरच गौतमी एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच गौतमी मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीची महाराष्ट्रात क्रेझ कायम आहे. आतापर्यंत गौतमीने अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी गौतमीने बायकोच्या वाढदिवसाला, लहान मुलांच्या देखील वाढदिवसाला हजेरी लावली होती. गौतमी ‘घुंगरू’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेक दिसणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. गौतमीचा हा पहिलाच चित्रपट नसून तिने यापूर्वी एका पंजाबी गाण्यात देखील अभिनय केला आहे.

‘घुंगरू’ सिनेमाची निर्मिती चिंतामणी सिने क्रिएशन्स प्रस्तुत बाबा गायकवाड आणि अजित केंद्रे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप डांगे यांनी केला आहे. चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याची सध्या सर्वत्र होत आहे. गौतमी सोबत ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या बाबा गायकवाड देखील चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

शेअर केलेल्या टीझरमध्ये, चित्रपटाच्या नावाप्रमाणेच गौतमी पाटील या चित्रपटात एका लावणी कलावंताची भूमिका साकारत आहे. तिच्या आयुष्यात येणाऱ्या अघटित घटनांमुळे नायकाच्या ती प्रेमात पडते. शेअर केलेल्या टीझरमध्ये, राजकारण, थरारदृश्य देखील पाहायला मिळणार आहे. चित्रपटात अनेक नवीन चेहेऱ्यांना संधी मिळाली आहे. यासोबतच अभिनेत्री उषा चव्हाण यांची देखील सिनेमात महत्वाची भूमिका असणार आहे. घुंगरु चित्रपटाच्या ऑफिशियल टिझरला प्रेक्षकांकडून पसंती मिळत असून चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात कायम आहे.

गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यावर अनेकदा राडा देखील झाला आहे. तिच्या गेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये राडा झाला होता. नुकतेच इंदुरीकर महारांजांनी तिच्यावर मानधनावरुन टीका केली होती. सोबतच सध्या तिच्या लाईफ पार्टनरची देखील अनेकदा सोशल मीडियावर चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा गौतमी लाईफ पार्टनरवरून चर्चेत आली आहे. ती सध्या २५ वर्षांची असून लवकरच लग्न करणार असल्याचे तिने सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

SCROLL FOR NEXT