Dadasaheb Phalake Awards 2023: चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा काल मुंबईत पार पडला. हा पुरस्कार सिनेसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना दिला जातो. 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या चित्रपटांना, सोबतच त्यातील कलाकारांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी दुलकर सलमान, आलिया भट्ट, तेजस्वी प्रकाश, रेखा , ऋषभ शेट्टी यांनी हजेरी लावली होती.
यावेळी सर्वच सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवत कार्यक्रमाला चार चॉंद लावले. यावेळी हा पुरस्कार रेखा, अजय देवगण, आलिया भट्ट, रणबीर कपूर सोबत अनेक कलकारांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
आलिया भट्टला गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर रणबीरला ब्रम्हास्त्र चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कर मिळाला. रणबीर त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने त्याने कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही. यावेळी अनेक सेलिब्रिटी आपल्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने कार्यक्रमाला अनुपस्थिती लावली होती.
2023 मध्ये दादासाहेब फाळके हा पुरस्कार संगीत क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्यामुळे हरिहरन यांना पुरस्कार देण्यात आला आहे. सोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आर बाळाक्रिष्णन, सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफर पी. एस. विनोद, मोस्ट प्रॉमिसिंगस ॲक्टर ऋषभ शेट्टी, सर्वोत्कृष्ट वेबसीरिज अजय देवगणची रुद्र, मनोरंजनसृष्टीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून रणबीर कपूरला ब्रम्हास्त्रसाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार गंगुबाई काठियावाडी चित्रपटासाठी आलिया भट्टला मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट द काश्मिर फाईल्स, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका निती मोहन, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक सचित टंडन, 2022मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट आरआरआर, सर्वोत्कृष्ट समीक्षक कलाकार वरुण धवन, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कलाकार अनुपम खेर, टीव्ही मालिकेतील सर्वोत्कृष्ट कलाकार झैन इमाम, सर्वोत्कृष्ट मालिका अनुपमा, नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कलाकार दुलकेर सलमान तर नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मौनी रॉय यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.