Hema Sharma ‘Dabangg 3’ Actress Allegations Saam Tv
मनोरंजन बातम्या

‘Dabangg 3’ Actress Hema Sharma Claims: ‘दबंग ३’ फेम अभिनेत्रीचे सलमानच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘श्वानासारखे बाहेर...’

‘Dabangg 3’ Actress Hema Sharma Shocking Alligation On Salman Khan Security: ‘दबंग ३’ मधील अभिनेत्रीने सलमान खानच्या सुरक्षा रक्षकांवर काही गंभीर आरोप लावले.

Chetan Bodke

Hema Sharma ‘Dabangg 3’ Actress Allegations: बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खान नेहमीच चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सलमानचा दबंग आणि त्याचे सिक्वेल बॉक्स ऑफिसवर फारच गाजले. दबंग प्रमाणे, ‘दबंग २’ आणि ‘दबंग ३’ ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. मात्र आता सलमान चित्रपटामुळे नाही तर एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे.

‘दबंग ३’ मधील अभिनेत्रीने सलमान खानच्या सुरक्षा रक्षकांवर काही गंभीर आरोप लावले. अभिनेत्रीने लावलेल्या या आरोपांची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.

२०१९ मध्ये घडलेला तो किस्सा सांगताना अभिनेत्री भावूक झाली आहे. हेमा शर्मा असं त्या अभिनेत्रीचे नाव असून तिने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. हेमा म्हणते, “मला ‘दबंग ३’ मध्ये काम करायचे होते. काम करण्यासाठी शक्य असेल तितके सर्व प्रयत्न केले, कारण मला सलमान सरांना भेटायचं होतं. चित्रपटात माझा पहिला सीन सलमान सरांसोबत होता. त्यामुळे मला सलमान सरांना भेटण्याची संधी मिळणार असल्याने मी खूपच खूश होते. मात्र तो सीन माझ्या शिवायच शूट करण्यात आला होता, त्यामुळे मी निराश झाले. शूट संपल्यानंतर एकदा तरी मला सलमान सरांना भेटण्याची इच्छा होती. मी त्यांना भेटण्यासाठी जवळपास ५० लोकांसोबत बोलले होते.”

हेमाने मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला. अभिनेत्री म्हणते, “मला सलमान सरांना भेटायचं होतं म्हणून पंडित जनार्दन यांची भेट घेतली होती, त्यांच्याकडे मी सलमान सरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी मला त्यांच्या भेटीचे आश्वासन दिले होते, त्यानंतर आम्ही सलमान सरांना भेटायला गेलो. सलमान सरांना भेटायला गेल्यावर मला किती वाईट वागणूक मिळाली आणि माझा किती अपमान झाला हे मी सांगू शकत नाही. तिकडे मला त्यांनी कुत्र्यासारखे बाहेर फेकले कारण मला त्यांच्याबरोबर फोटो काढायचा होता.”

अभिनेत्री पुढे मुलाखतीत म्हणते, “त्यांनी जवळपास माझा १०० लोकांसमोर घोर अपमान केला. अपमान झालेल्यांमध्ये मला वैयक्तिकरित्या ओळखणाऱ्या अनेकांचा समावेश होता. या घटनेनंतर माझा अपमान झाल्यानंतर मला १० दिवस झोप येत नव्हती. त्यावेळी घटनास्थळी सलमान सर देखील उपस्थित नव्हते. पण ते आजूबाजूला होते, त्यांना हवे असते तर ते हस्तक्षेप करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. यापुढे मी कधीच सलमान सरांना भेटायला जाणार नाही.” असं म्हणत तिने आपल्यासोबत घडलेला किस्सा शेअर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांगणीत रेल्वे प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी'; वनविभागाची परवानगी न घेता भूयारी मार्गाचं काम, चूक लक्षात येताच जागा बदलली

Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

Co-ord Sets: ऑफिस आणि कॉलेज वेअरसाठी ट्राय करा कम्फर्टेबल आणि ट्रेंडी को-ऑर्ड सेट्स, तिन्ही सिझनसाठी परफेक्ट चॉईस

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास?

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT