Anushka Sharma Virat Kohli Saam TV
मनोरंजन बातम्या

Virat Kohli: 'काय झाडी, काय डोंगर...' विराट- अनुष्काचे वॅकेशन मूड ऑन, ट्रेकिंग करताना केले खास फोटो शेअर...

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या त्याच्या फॅमिलीसोबत सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Chetan Bodke

Virat Kohli And Anushka Sharma: भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या त्याच्या फॅमिलीसोबत सुट्टीचा आनंद लुटत आहे. सध्या विराट, पत्नी अनुष्का आणि त्यांची लेक सुद्धा सुट्टीचा आनंद लुटत आहे. नुकतेच विराटने सुट्टीचा आनंद लुटत असल्याची पोस्ट चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे.

विराटने शेअर केलेल्या फोटोत त्यांची मुलगी आणि अनुष्का ट्रॅकिंग करताना दिसत आहे. सध्या विराट आणि अनुष्का उत्तराखंडमधील ऋषिकेश या प्रसिद्ध शहरात असून तेथील हवामानाचा आनंद लुटत असल्याचे दिसुन येत आहे.नुकतेच विराट आणि अनुष्काने वृंदावनमध्ये जाऊन त्यांच्या एका बाबांचेही दर्शन घेतले. त्यानंतर कोहलीने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेमध्ये चमकदार कामगिरी केली, असे काही चाहत्यांचे मत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेनंतर, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिष्ठित बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळायची आहे. महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याने पुन्हा एकदा आपले गुरू स्वामी दयानंद यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

गुरु स्वामी दयानंद हे केवळ विराट कोहलीचेच नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही गुरू आहेत. 2015 मध्ये पीएम मोदींनी आश्रमाला भेट दिली आणि स्वामी दयानंद गिरी यांचे आशीर्वाद घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT