Comedy queen Bharti Singh and her husband Harsh Limbachia with baby lakshy Saam Tv
मनोरंजन बातम्या

भारती सिंगच्या मुलाचा 'हा' लूक झाला व्हायरल; लक्ष्यच्या क्यूटनेसवर अभिनेत्रीही झाल्या फिदा

कॅामेडी क्विन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी एप्रिलमध्ये त्यांचा मुलगा लक्ष्यचे स्वागत केले. नुकताच या कपलने आपल्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कॅामेडी क्विन भारती सिंह(Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी एप्रिलमध्ये त्यांचा मुलगा लक्ष्यचे स्वागत केले. नुकताच या कपलने आपल्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुलाच्या आगमनाने भारती आणि हर्ष खूप आनंदी आहेत. लक्ष्याच्या जन्मानंतर काही दिवसांनी या कपलने त्यांच्या गोंडस बाळाचे फोटोशूट केले आहे. भारतीने नुकतेच तिच्या मुलाचे काही फोटो(Social media) सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लक्ष्य हॅरी पॉटर लूकमध्ये दिसत आहे.

भारती सिंहने इन्स्टाग्रामवर लक्ष्यचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये, बाळाला चमकदार पिवळ्या आणि मरून रंगाच्या स्वॅडलमध्ये ठेवले आहे. बाळाला गोल चष्मा घातला आहे. त्याला टोपलीसारख्या दिसणाऱ्या पलंगावर शांतपणे झोपवले आहे.त्याला लोकरीची टोपी घातली आहे आणि त्याच्या हातात हॅरी पॉटरची जादूची छडी आहे.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा लक्ष्यच्या हॅरी पॉटर लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मुलगा लक्ष्यचा फोटो शेअर करत 'लक्ष्य सिंह लिंबाचिया पॉटर', अशी भारतीने त्याची ओळख करून दिली आहे.

भारती सिंहने तिचा मुलगा गोला म्हणजेच लक्ष्यचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. चाहते कमेंट करून लक्ष्यच्या क्यूटनेसचे कौतुक करत आहेत. या कपलच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांनी लक्ष्यला आशीर्वाद दिले आहेत. अभिनेत्री गौहर खानने हार्ट इमोजीसह 'ब्लेस हिम' अशी कमेंट केली आहे. त्याचवेळी शमिता शेट्टी आणि ईशा गुप्ता यांनी हार्ट इमोजीसह कमेंट केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT