Sunil Pal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sunil Pal : बेपत्ता सुनील पाल २४ तासांत सापडले; बायकोने दिली मोठी अपडेट, म्हणाली...

Sunil Pal Missing Case Update: कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिली होती. आता या संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे.

Shreya Maskar

कॉमेडियन अभिनेते सुनील पाल (Sunil Pal) हे कायमच त्यांच्या कॉमेडीमुळे चर्चेत असतात. मात्र सध्या ते एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. सुनील पाल यांच्या पत्नीने त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार केली होती. मात्र आता या घटनेसंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे.

कॉमेडियन अभिनेते सुनील पाल बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी सरिता पालने मुंबईतल्या सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दिली होती. सरिता पालने (Sarita Pal) केलेल्या तक्रारीत असे म्हटले होते की, "सुनील पाल आज घरी आले नाही. त्यांचा फोन देखील स्विच ऑफ लागत आहे. त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नाही. म्हणून मी पोलीसात तक्रार करत आहे." सुनील पाल हे कॉमेडियन असल्यामुळे ते अनेक वेळा शोसाठी मुंबईच्या बाहेर जात असे.

आता या घटनेसंबंधित सरिता पाल यांनी मोठी अपडेट दिली आहे @viralbhayani च्या वृत्तानुसार,"सरिता पाल यांचा सुनील पाल यांच्यासोबत संपर्क झाला आहे. त्यांनी लिहिलं की, माझ सुनील पाल यांच्याशी बोलणे झाले आहे. तसेच ते पोलिसांशी देखील बोलले आहे."

मीडिया रिपोर्टनुसार, 3 डिसेंबरला सुनील पाल घरी येणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. तसेच त्यांच्याशी संपर्क देखील होत नव्हता. ते शो साठी मुंबईच्या बाहेर गेले होते. यामुळे काळजीने पत्नी सरिता पालने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.

कॉमेडियन सुनील पाल यांनी आपल्या विनोदी शैलीने सर्व जगाला हसवले आहे. त्यांनी कॉमेडी किंग कपिल शर्मासोबतही काम केले आहे. सुनील पाल यांचे शो जगभरात होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT