प्रेक्षकांच्या भेटीला नवीन मराठी मालिका येत आहे.
नवीन मालिकेत शूटिंगच्या सेटवर सुरू झालेली लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.
नव्या मालिकेत लोकप्रिय स्टारकास्ट आहे.
कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी आणखी एक नवीन कोरी मालिका घेऊन येत आहे. फिल्मी दुनियेच्या सेटवर जन्मलेली एक सामान्य मुलगी आणि त्याच सेटवर राज्य करणारा एक सुपरस्टारची लव्हस्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंडस्ट्रीताल चकाकी, त्यामागील त्याग, संघर्ष आणि भावनिक घालमेल यांची खरी बाजू मालिकेत मांडली जाणार आहे. या नव्या कोऱ्या मालिकेचे नाव 'मोहिनी' असे आहे.
नशिबाने लिहिलेला मोहिनीचा प्रवास आणि अहंकाराने उभे केलेले सुपरस्टारचे विश्व जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा एक वेगळीच गोष्ट जन्माला येते. मोहिनी आणि RKची गोष्ट आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या माणसांचे भावविश्व रंगावणाऱ्या या मालिकेत 'मोहिनी'ची ही भूमिका अभिनेत्री अनघा ठाकूर आणि RKच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता समीर परांजपे झळकणार आहे. मालिकेच्या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या समीरचा या मालिकेत हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. मोहिनी एक मेकअप आर्टिस्ट आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शूटिंग सुरू आहे. सर्वजण निवांत असताना तिथे RK ची एन्ट्री होतो आणि सर्वजण कामाला लागतात. डिरेक्टर Let’s Roll म्हणतो, लाईट्स ऑन होतात आणि हातात कॉफी मग घेत RK रुबाबदार अंदाजात पुढे येतो. तेवढ्यात RKच्या मेकअपसाठी मोहिनी पुढे येते आणि RKला धडकते. त्यामुळे तिचे मेकअपचे सगळे सामान पडते. तेवढ्यात RK सामानावर पाय देण्याचा प्रयत्न करतो मात्र तेवढ्यात मोहिनी त्याला थांबवते. म्हणते, "सामान मेकअपचे आहे. पण फक्त नाही, हेच सामान माणसाला कलाकार, कलाकाराला स्टार आणि स्टार ला सुपरस्टार बनवते. अहंकार असणाऱ्याला याचे भान नसते, पण जाणते कलाकार मात्र याला मान देतात. " सेटवर शांतता पसरते. संतापलेल्या RK पॅकअपची घोषणा करतो आणि निघून जातो.
मालिकेच्या प्रोमो व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की,"मोहिनीचा स्वाभिमान विरुद्ध RK चा अहंकार...सेटवर सुरू झालेली ही कथा जेव्हा खऱ्या आयुष्याच्या पडद्यावर उतरणार, तेव्हा काय घडणार? सत्य मनोरंजनावर आधारित नवी गोष्ट 'मोहिनी' येतेय आपल्या भेटीला लवकरच..." या प्रोमो व्हिडीओवर प्रेक्षक भरभरून कमेंट्स करत आहे. प्रेक्षक मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत. मात्र अद्याप मालिकेची रिलीज डेट समोर आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.