Ashok Mama  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Ashok Mama serial Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत अशोक मामा आणि भैरवी एकत्र मिळून संकटांवर मात करताना दिसत आहे. मालिका आता नवीन वळण घेत आहे.

Shreya Maskar

'अशोक मा.मा.' मालिकेत अनिशमुळे भैरवी आणि अशोक मामांच्या आयुष्यात संकटे येत आहेत.

अशोक मामा मात्र भैरवीला तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साथ देताना दिसत आहे.

आता अनिशमुळे अशोक मामांच्या आयुष्यात नवे वादळ येणार आहे.

'अशोक मा.मा.' मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अनिशमुळे भैरवीच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकटे येताना दिसत आहे. 'अशोक मा.मा.' मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. मालिकेने नुकताच 300 भागांचा पल्ला गाठला आहे. आता मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. स्पर्धेत दहा लाखाचे बक्षीस मिळवल्यानंतर भैरवीच्या घरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. अशोक मामा, नीलिमा आणि मुलं भैरवीसाठी सरप्राईज पार्टी आयोजित केली असते.

कुटुंबाचे प्रेम आणि आदर पाहून भैरवी खूप खुश आहे. मात्र, या आनंदाच्या क्षणी एक भावनिक वळण येते. भैरवीने संपूर्ण बक्षिसाची रक्कम अनिशचे कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचे समोर येते. यामुळे अनिशचा संताप होतो. तो भैरवीवरील कठोर शब्दात सुनावतो. ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो. पण या सगळ्यातही भैरवी शांत राहते. तिचा आत्मविश्वास ढळत नाही. या सगळ्यामध्ये भैरवीला अशोक मामांची खंबीर साथ लाभते.

'अशोक मा.मा.' (Ashok Mama) मालिकेत भैरवीला राजन सुखटणकर यांच्या सुखटणकर फूड्सकडून केकसची ऑर्डर मिळते. मात्र त्यात एक गोंधळ होतो. केकऐवजी मोदक पोहोचतात. जे संकट वाटत होते तेच भैरवीसाठी मोठी संधी ठरते. राजनला ते मोदक खूप आवडतात. तो थेट 30 आउटलेट्ससाठी ऑर्डर देतो. पण या संधीबरोबर एक मोठे आव्हानही भैरवी समोर येते. आता हे नवीन संकट काय असेल आणि भैरवी त्याला कसं सामोरे जाणार हे सर्व पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

घरातील अनिशच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे तणाव आणखी वाढतो. अशोक मामा आणि भैरवी या सगळ्याचा मानसिक ताण घेतात. भैरवी आयुष्यात आलेल्या नवीन टप्प्याला कशी समोर जाणार? कुटुंबाची साथ तिला कशी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिका कलर्स मराठीवर दररोज रात्री 8.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्गात कुणी नव्हतं, महिलेसोबत 'नको त्या स्थितीत' शिक्षकाला पकडलं, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूट करून केला व्हायरल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! कधीपर्यंत लागू होणार? वाचा सविस्तर

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

SCROLL FOR NEXT