Citadel Teaser
Citadel Teaser Instagram/ @priyankachopra
मनोरंजन बातम्या

जबरदस्त ॲक्शन अन् भन्नाट विषय असणाऱ्या 'Citadel'चा टीझर आलाय, Priyanka Chopra च्या लूकने लावले चार चाँद

Chetan Bodke

Citadel Teaser: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी 'सिटाडेल' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. दरम्यान, प्राइम व्हिडिओने 'सिटाडेल'चा टीझर प्रदर्शित केला आहे. या शोमध्ये प्रियंकासोबत रिचर्ड मॅडन आणि स्टॅनले टुसी देखील दिसणार आहेत. जबरदस्त ॲक्शन सीन्सने असलेला ही वेबसीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या बराच पसंदीस आलेला आहे. याआधी शोमधून प्रियांकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. अभिनेत्रीने स्वतः तिचा पहिला लूक आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला होता, तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

'सिटाडेल'च्या टीझरमध्ये, प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडनची झलक पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये जबरदस्त ॲक्शन सीन्स दिसत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसत आहे. या शोमध्ये लेस्ली मॅनविले देखील आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की त्याचे पहिले दोन भाग 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होतील. तर त्याचा ट्रेलर १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वी प्रियांका चोप्राने सोमवारी 'सिटाडेल' मधील तिचा पहिला लूक शेअर केला होता. ज्याला शेअर करत तिने 'फर्स्ट लुक'लिहिले होते. समंथा रुथ प्रभू, राजकुमार रावसह अनेक सेलिब्रिटींनी यावर कमेंट केली होती. 'सिटाडेल' हे रुसो ब्रदर्सने निर्माण केलेली विज्ञानावर आधारित कथा आहे.

'सिटाडेल' व्यतिरिक्त प्रियांका चोप्रा लवकरच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या वर्षापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत. हा चित्रपट ‘Female Road Trip’ या विषयावर चित्रपट आधारित आहे. यापूर्वी बॉलिवूडमध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये असा विषय हाताळण्यात आला होता. याशिवाय प्रियंका सॅम ह्यूगनसोबत 'लव्ह अगेन'मध्ये दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

Varsha Gaikawd News| महाराष्ट्राने गद्दारांना कधीच माफ केलं नाही - गायकवाड

Monsoon 2024 : आनंदाची बातमी! यंदा मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल; या दिवशी धडकणार केरळात

Dhananjay Mahadik : कोल्हापुरात राजकीय आखाडा तापला; भर सभेत धनंजय महाडिक सतेज पाटील यांच्यावर बरसले

Potatoes Benefits: बटाटे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा फायदे

SCROLL FOR NEXT