chhabi Marathi Movie PR
मनोरंजन बातम्या

chhabi Movie: फोटो आणि कॅमेऱ्यामागील गोष्ट आता रूपेरी पडद्यावर; 'छबी' चित्रपटातून उलगडणार अनोखी कहाणी

chhabi Marathi Movie: प्रत्येक फोटोमागील फोटोग्राफर्सची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

chhabi Movie: प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफर्सची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.

केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेेंट यांनी 'छबी' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जया तलक्षी छेडा निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांच असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे.

चित्रपटात ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश कदम, अपूर्वा कवडे या नव्या दमाच्या कलाकारांसह अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे, अभिनेत्री शुभांगी गोखले, राजन भिसे, जयवंत वाडकर,संकेत मोरे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार आहेत. त्यामुळे चित्रपटाची अभिनयाची बाजू खणखणीत आहे यात शंका नाही.

कोकणातील गावात फोटोग्राफर असलेल्यातरुणाची रंजक कथा 'छबी' या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यावर नक्कीच यामध्ये सस्पेन्स,थ्रिलर, रोमांस नक्कीच अनुभवता येणार असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येतोय. प्रत्येक छबीत एक गोष्ट असते अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे फोटो आणि कॅमेऱ्यामागील नाट्य आता पडद्यावर उलगडणार आहे. नव्या-जुन्या कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी असलेला, नावीन्यपूर्ण गोष्ट असलेला "छबी" चित्रपट पाहण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT