Chhaava Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection : 'छावा'ची उंच भरारी! अवघ्या ४ दिवसात चित्रपटानं केलं बजेट वसूल, कलेक्शनचा आकडा किती?

Chhaava Box Office Collection Day 4 : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने अवघ्या चार दिवसात चित्रपटाचे बजेट वसूल केले आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

Shreya Maskar

लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' (Chhaava ) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहायला मिळत आहेत. तर चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

'छावा' चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. आता 'छावा' चित्रपटाने अजून एक रेकॉर्ड केला आहे. अवघ्या चार दिवसात 'छावा'ने चित्रपटाचे बजेट वसूल केले आहे. 'छावा' चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे.

  • पहिला दिवस - 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • एकूण - 140.50 कोटी रुपये

'छावा' ओटीटी अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले आहेत. 'छावा' तीन ते चार महिन्यांनंतर घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी ओटीटी रिलीजच्या डेटची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

'छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 5 कोटींची व्यवसाय केला होता. प्रेक्षकांकडून चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील विकी कौशलचा दमदार अभिनय, शाही सेट आणि कलाकारांचे पोशाष पाहून चाहते भारावून गेले आहेत. चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांकडून विशेष पसंती मिळत आहे. 'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT