Chandramukhi Viral Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Viral Video: परदेशातील नागरिकांना अजूनही मराठमोळ्या चंद्राची भुरळ; डान्स पाहून व्हाल थक्क...

परदेशातील काही नागरिकांचा एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओत परदेशी तरुणी चंद्राया गाण्यावर थिरकात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: चंद्रा गाण्याने सर्वांवरच आपली छाप सोडली आहे. अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे. अख्ख्या महाराष्ट्राला नाचवणाऱ्या चंद्राची महती भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांवरही भुरळ पडली आहे. सर्वच जण या गाण्यावर एकदा तरी थिरकले असणार. या गाण्यावर डान्स करण्यासाठी परदेशातील चाहतेही कसे काय मागे राहणार? (Viral Video)

परदेशातील काही नागरिकांचा एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओत परदेशी तरुणी चंद्रा (Chandramukhi) या गाण्यावर थिरकाताना दिसत आहेत. परदेशातील तरुणींनी थेट रस्त्यावर या गाण्यावर हुबेहुब अमृता खानविलकर सारखा डान्स सादर केला आहे. या तरुणी प्रोफेशनल डान्सर असल्याचे डान्समधून दिसत आहेत. विशेष म्हणजे शॉर्ट आणि टॉप त्यात गळ्यात विविधरंगी स्टोल अशा पेहरावात या गाण्यावर तरुणी थिरकलेल्या दिसल्या.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओला मोठा प्रतिसाद अजय-अतुल फॅन्स नावाच्या एका फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून त्याला ४० हजारांहून अधिक लाईक्स, ८०० हून अधिक कमेंट्स आणि जवळपास साडेचार हजार शेअर्स आहेत. या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या व्हिडिओतील तरुणींच्या ग्रुपचे कौतुक केलेले दिसत आहे. सोबतच अनेकांनी अजय-अतुलच्या संगीताची जादूच निराळी असल्याचं ही म्हटले आहे.

अनेकांनी चंद्रा गाण्याची कोरियोग्राफर फुलवा खामकर, गायक श्रेया घोषाल आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या कामाचेही कौतुक केले आहे. विश्वास पाटलांच्या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी चित्रपट असून चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकचे आहे. चित्रपट एक बडा राजकारणी आणि तमाशा कलावंतीन यांच्यावर बेतलेला आहे. एका बाजूला राजकीय आयुष्य आणि त्यातील संघर्ष तर दुसरीकडे बहरदार प्रेम याचा सुंदर मेळ चित्रपटात दिसत आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Rishab Shetty : ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार; 'कांतारा: चॅप्टर १'चं नवं पोस्टर रिलीज, पाहा PHOTOS

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

SCROLL FOR NEXT