Arvind Jagtap Post  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arvind Jagtap: 'घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना कळलंच नाही...', लेखक अरविंद जगताप यांची पोस्ट चर्चेत

NCP Party Name And Symbol: प्रसिद्ध पटकथा आणि संवाद लेखक अरविंद जगताप यांनी नुकताच केलेली सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी ही पोस्ट केल्यामुळे त्याची चर्चा होत आहे.

Priya More

Arvind Jagtap Insta Post:

सध्या राज्यातील राजकारण चांगलेच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव हे अजित पवार यांच्या गटाकडे गेले. निवडणूक आयोगाने मंगळवारी यासंदर्भातला मोठा निर्णय दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यापासून ते देशापर्यंत सध्या याचीच चर्चा सुरू आहे.

अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आपले मत मांडली आहे. काहींनी अजित पवार यांच्या बाजूने तर काहींनी शरद पवार यांच्या बाजूने आपलं मत मांडले आहे. अशामध्ये आता प्रसिद्ध पटकथा आणि संवाद लेखक अरविंद जगताप यांनी नुकताच केलेली सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी ही पोस्ट केल्यामुळे त्याची चर्चा होत आहे.

लेखक अरविंद जगताप यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना कळलंच नाही... हा जमाना आकड्यांचा आहे.' त्याची ही पोस्ट चर्चेत आली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर घड्याळाचे चिन्ह दिसत आहे तर बॅकग्राऊंडला आकडे दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त करायला सुरूवात केली आहे.

अरविंद जगताप यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'कुणाचे घड्याळ कुणाच्या हाता मोडले धनुष्य रिकामा भाता' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'काय योग्य वेळ साधली आहे तुम्ही घड्याळातील' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'हा देश लोकशाही तत्वाने बहुमतावर चालला पाहिजे घराणेशाहीवर नाही.' आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'ठाकरे दमले, पवार झाले गपगार... आकड्यांच्या या खेळात होणार जनता मात्र बेजार.'

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत पक्षाचे चिन्ह आणि नावावर दावा केला. यावर मंगळवारी सुनावणी करताना निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी दुपारपर्यंत तीन नावांचे पर्याय देण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढत दिला चोप; पाहा VIDEO

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT