प्रसिद्ध हास्यकलाकाराची ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saagar Karande: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेची फसवणूक, घरबसल्या पैसे कमावण्याच्या नादात गमावले ६१.८३ लाख रुपये

Fraud: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेची घरबसल्या पैसे कमावण्याच्या नादात ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्याला एका ऑनलाइन फ्रॉडच्या माध्यमातून हे नुकसान भोगावे लागले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध हास्यकलाकार, लेखक आणि अभिनेता सागर कारंडे यांची तब्बल ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. "इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा" या आमिषाला बळी पडून ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाणे (उत्तर विभाग) येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात, सागर कारंडे यांला अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून एका महिलेचा मेसेज आला. त्या महिलेने टेलिग्राम व अन्य समाजमाध्यमांवर इन्स्टाग्राम लिंक पाठवत त्यावर लाईक करण्याची विनंती केली. प्रत्येक लाईकसाठी १५० रुपये दिले जातील आणि घरबसल्या ६,००० पर्यंत कमवता येईल असे सांगितले.

सागरनी त्यास होकार दिला आणि काम सुरू केले. मात्र नंतर विविध कारणांनी पैसे गुंतवायला लावून सायबर भामट्यांनी त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली.

फसवणुकीची प्रक्रिया

१. सागरला सुरुवातीला ११ हजार रुपये दहा वेळा मिळाले, ज्यामुळे त्याचा विश्वास बसला. पुढे अधिक पैसे कमवण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल, असे सांगण्यात आले.

२. सुरुवातीला सागरने थोडी रक्कम गुंतवली. भामट्यांनी तयार केलेल्या वॉलेटवर कमिशन व मोबदला जमा केला गेला. पुढे सागरने २७ लाख रुपये गुंतवले. पैसे काढताना, "८०% टास्क पूर्ण आहे, १००% झाल्यावरच पैसे काढता येतील" असे सांगण्यात आले.

३. आणखी १९ लाख रुपये आणि त्यावर ३०% कर भरायला लावण्यात आला. एकूण सागरकडून ६१.८३ लाख रुपये घेतले गेले. नंतर कर चुकीच्या खात्यात भरल्याचे सांगून पुन्हा पैसे मागण्यात आले. यावरून सागरला संशय आला आणि त्याने सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

Crime News: आत्या आणि पुतण्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

India's Richest Person: अब्जाधिशांच्या यादीत 'किंग'ची एन्ट्री, शाहरूख खानची संपत्ती किती?

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT