Shreya Bugde Post On Ganpati Visarjan Instagram
मनोरंजन बातम्या

Shreya Bugade: ‘....आणि नेहमीसारखे अश्रू अनावर झाले’; लाडक्या गणरायाला निरोप देताना श्रेया बुगडे झाली भावुक

Shreya Bugde Post: अभिनेत्री श्रेया बुगडे गणपती बाप्पाला निरोप देताना भावूक झाली होती. तिची बाप्पाचं विसर्जन करताना कशी अवस्था झाली होती, हे तिने पोस्ट शेअर करत सांगितले.

Chetan Bodke

Shreya Bugde Post On Ganpati Visarjan

‘चला हवा येऊ द्या’फेम श्रेया बुगडे कायमच तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या खुमासदार कॉमेडीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. श्रेयाला मराठी सिनेसृष्टीत ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमुळे एक वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे. अनेक अभिनेत्रींची नक्कल करत, आपल्या खास पद्धतीने चाहत्यांना हसवण्याची स्टाईल सर्वांना फारच आवडते. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर लाडक्या गणरायासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ही शेअर केलेली पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.

नुकतंच काल पाच दिवसांच्या गणरायाला आपण सर्वांनी निरोप दिला. अगदी जनसामान्यांपासून अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या घरच्या गणपती बाप्पाला भावुक होत निरोप दिला. अशीच अवस्था अभिनेत्री श्रेया बुगडेचीही झाली होती. श्रेयाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बाप्पाचं विसर्जन करताना तिची अवस्था कशी झाली होती, यावर तिने भाष्य केलं आहे. श्रेया बुगडे आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “काल ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ असे म्हणत तुझा निरोप घेतला ..आणि नेहमीसारखे अश्रू अनावर झाले....”

पोस्टमध्ये पुढे श्रेया म्हणते, “गेल्या इतक्या वर्षात ह्या ५ दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना काही मागितल्याचं मला आठवत नाही... पण एक सांगेन ह्या ५ दिवसात तुझ्या येण्याने जेवढा आनंद मला मिळतो तो मला कधीच शब्दात मांडता येणार नाही. तुझ्या निमित्ताने सगळी माझी प्रेमाची माणसं एकत्र येतात. तुझं कौतुक करतात. तेव्हा मनाला होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. ही प्रथा वर्षांनुवर्षे अशीच चालू ठेव. तुझी सेवा करायची संधी आम्हला देत राहा! विसर्जन फक्त म्हणायला रे, बाकी माझ्यासोबत तू असतोसच की... कायम दिसत राहतोस. कधी कामात, कधी माणसांमध्ये…”

आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात श्रेया बुगडे म्हणते, “माझ्यावर आतोनात निःस्वार्थ प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. आणि हा तू मला दिलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. मम्मा म्हणते तसं “जाते नाही येते म्हणावं गं” मग आता.. ये लवकर पुढच्या वर्षी आनंदाने... तुला सगळ्यासाठी खूप थँक यू! आणि एक घट्ट मिठी (तुला तर माहितीये आपलं) सुखी राहा! आनंदात राहा.. तुला खूप प्रेम.. भेटूच”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT