Celina jaitley return india Google
मनोरंजन बातम्या

Celina jaitley : ममता कुलकर्णीनंतर ही अभिनेत्री तब्बल १४ वर्षांनी परतली भारतात; या कारणासाठी आली देशाची आठवण

Celina jaitley return india: अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनी दुबईहून भारतात परतली तेव्हा तिचे नाव सर्वत्र चर्चेत होती आता आणखी एक अभिनेत्री तब्बल १४ वर्षांनंतर भारतात परतली आहे.

Shruti Vilas Kadam

Celina jaitley : ९० च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनी दुबईहून भारतात परतली तेव्हा तिचे नाव सर्वत्र चर्चेत होते. २०२४ च्या अखेरीस ती भारतात आली आणि २०२५ वर्ष सुरू होताच तिने सन्यास घेतला आहे. आता आणखी एक अभिनेत्री वर्षानुवर्षे परदेशात राहिल्यानंतर भारतात परतली आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सेलिना जेटली आहे.

सेलिनाने अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर यांच्या सुपरहिट चित्रपट 'नो एंट्री' मध्येही दिसली होती. अलीकडेच, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना तिने सांगितले आहे की ती १४ वर्षांनी मुंबईत परतली आहे. इतक्या वर्षांनी ती भारतात का आली आहे? या प्रश्नाचे उत्तर तिने दिले आहे.

सेलिना जेटली भारतात का आली?

सेलिना जेटली म्हणाली आहे की ती कामासाठी भारतात आली आहे. याचा अर्थ असा की आपण तिला पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये पाहू शकतो. सेलिनाने इंस्टाग्रामवर लिहिले, “इंग्लिश बाबू देसी मेम: १४ वर्षे परदेशात प्रवास केल्यानंतर, मी फक्त कामासाठी परत आली आहे #aamchimumbai.”

ती म्हणाली, “काही लोक चार दिवसांच्या सुट्टीवर जातात आणि त्यांचे बोलण्याचे स्वर बदलतात. दरम्यान, १४ वर्षे सिंगापूर, दुबई आणि युरोपमध्ये राहूनही माझ्या इंग्रजी भाषेतील उच्चार बदललेला नाही. खरंतर, ऑस्ट्रियामध्ये जर्मन बोलल्याने माझ्या इंग्रजीवर निश्चितच परिणाम झाला आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Luckiest zodiac signs: आज कोणाच्या जीवनात येणार शुभवार्ता? पंचांग आणि ग्रहयोग देतायत मोठं संकेत!

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

SCROLL FOR NEXT