Usha Nadkarni SAAM TV
मनोरंजन बातम्या

Usha Nadkarni : 'आयुष्यात एवढी नालायक व्यक्ती...' सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये उषा नाडकर्णी कोणावर भडकल्या?

Usha Nadkarni Angry On Archana Gautam : 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या नवीन प्रोमोमध्ये उषा नाडकर्णी शोमधील एका स्पर्धकावर भडकलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. नेमकं झाले काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' (celebrity masterchef ) हा शो चांगलाच रंगत आहे. सेलिब्रिटींना रोज नवीन पदार्थ बनवण्याचे टास्क देण्यात येतात. त्यामुळे रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. नुकताच शो चा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धकांना नवीन टास्क दिल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) या देखील भडकलेल्या पाहायला मिळत आहे.

प्रोमोमध्ये शेफ रणवीर बरार (Ranveer Brar) फुल आणि काटे या मिस्ट्री बॉक्सच्या आधारे स्पर्धकांना नवीन पदार्थ बनवायला सांगतो. तर आधीच्या टास्कची विजेता अर्चना गौतमला कोणाला फुलं द्यायचे आणि कोणाला काटे हे निवडण्याचा अधिकार दिला. यावेळी अर्चना गौतम उषा नाडकर्णी आणि राजीव अडातिया (Rajiv Adatia) यांना काट्यांचा मिस्ट्री बॉक्स देते. त्यामुळे उषा नाडकर्णी नाराज होतात.

व्हिडीओच्या शेवटच्या टप्प्यात अर्चना गौतम (Archana Gautam ) अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना हाक मारते. तेव्हा उषा नाडकर्णी खूप भडकतात आणि म्हणतात की, "माझं नाव घेऊ नकोस... मी आयुष्यात एवढी नालायक बाई पाहिली नाही..." 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' उषा नाडकर्णी आणि अर्चना गौतमचे कधीच पटत नाही.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, मिस्टर फैजू, राजीव अडातिया आणि गौरव खन्ना हे टॉप ५ स्पर्धक असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' चा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT