Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Cancer Patient Watching Movie During Operation Theater: ज्युनिअर एनटीआरचे फक्त देशातच नव्हे तर जगभरात चाहते आहे. एका चाहत्याने चक्क शस्त्रक्रिया सुरु असताना ज्युनिअर एनटीआरचा चित्रपट पाहिला आहे.

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणजे ज्युनिअर एनटीआर. ज्युनिअर एनटीआरचे फक्त देशातच नव्हे तर जगभरात चाहते आहे. एका चाहत्याने चक्क शस्त्रक्रिया सुरु असताना ज्युनिअर एनटीआरचा चित्रपट पाहिला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दाक्षिणात्य कलाकारांची फॅनफॉलोविंग खूप तगडी आहे. अनेक चाहते तर त्यांची पूजा करतात. त्यांच्या नावाने नवस बोलतात. अनेक सुपरस्टार्सची तर मंदिरेदेखील बांधली आहेत. अशातच ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. ज्यांच्यावर त्याचे चाहते जीव ओवाळून टाकतात. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो म्हणजे एका महिलेने शस्त्रक्रिया सुरू असताना चक्क ज्युनिअर एनटीआरचा चित्रपट पाहल्याचं चित्र समोर आलं आहे.

लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच चित्रपट पाहण्याचं वेड असतं. कुठेही अन् कोणत्याही वेळी व्यक्ती ही चित्रपट पाहते. आनंद असो की दु:ख मन हलके करण्यासाठी चित्रपट पाहिले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. नुकताच आध्रं प्रदेशमध्ये एका महिलेकवर हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू होती. यावेळी ही महिला ऑपरेशन थिएटरमध्ये चक्क ऑपरेशन सुरू असताना चित्रपट बघत होती. याचदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला ऑपरेशन थिएटरमध्ये झोपली आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. डॉक्टरांकडून उपचार सुरू असताना ही महिला चित्रपटातील कॉमेडी सीन बघत असताना दिसतेय.

माहितीनुसार या माहिलेची ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करणं हे डॉक्टरासाठी मोठ आव्हानात्मक काम होतं. यावेळी या महिलेने ही अनोखी शक्कल लढवली आहे यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक करत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT