Canadian Actor Kenneth Mitchell Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kenneth Mitchell: कॅप्टन मार्वलच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे ४९ व्या वर्षी निधन, गंभीर आजाराशी झुंज अपयशी

Canadian Actor Kenneth Mitchell: केनेथला गंभीर आजार झाला होता. गेल्या ५ वर्षांपासून तो या आजाराने ग्रस्त होता. अखेर या आजाराशी त्याची झुंज अपयशी ठरली. त्याच्या निधनामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.

Priya More

Kenneth Mitchell Passes Away:

प्रसिद्ध कॅनेडियन अभिनेता केनेथ मिशेल (Kenneth Mitchell) यांचे निधन झाले. शनिवारी २४ फेब्रुवारीला वयाच्या ४९ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. केनेथला गंभीर आजार झाला होता. गेल्या ५ वर्षांपासून तो या आजाराने ग्रस्त होता. अखेर या आजाराशी त्याची झुंज अपयशी ठरली. तो 'स्टार ट्रेक: डिस्कव्हरी' आणि मार्वलच्या कॅप्टन मार्वल मालिकेत दिसला होता. केनेथच्या निधनाची बातमी त्याच्या कुटुंबीयांनी अभिनेत्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली. केनेथच्या निधनाचे वृत्त कळताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून ते सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त करत आहे.

अभिनेत्याच्या कुटुंबियांनी एक निवेदन जारी केले. यामध्ये त्यांनी असे लिहिले की, 'आम्ही जड अंतःकरणाने आमचे प्रिय वडील, पती, भाऊ, काका, मुलगा आणि प्रिय मित्र केनेथ अलेक्झांडर मिशेलचे निधन झाल्याचे सांगत आहोत.' २०१८ मध्ये केनेथला एएलएसचे निदान झाले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली होती.

या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, 'माझ्या भावाने भावनिकरित्या सांगितले की त्याच्याकडे एएलएस वर्धापनदिनाच्या शुभेच्छा कार्ड नाही. पण मला आजचा दिवस साजरा करायचा आहे. ही जीवनाची देणगी आहे. हा दिवस माझ्यावर आला म्हणून मी कृतज्ञ आहे. पाच वर्षे उलटून गेली. खूप काही गमावले आणि खूप काही मिळवले. आश्चर्यकारकपणे कठीण काळ आणि अनेक आशीर्वादांसह मिश्रित आहे.'

अभिनेत्याने पुढे सांगितले होते की, 'मित्र आणि कुटुंबीय, प्रियजन आणि डॉक्टर आहेत. जे माझ्या कुटुंबाच्या मदतीला वारंवार येत आहेत. भरपूर समर्थन आणि प्रेम आणि काळजी आणि प्रोत्साहन देत आहेत. यामध्ये सुंदरता आहे. हा रोग खूपच भयंकर आहे, तरीही सर्व दुःख असूनही मी त्याबद्दल कृतज्ञ आहे. कारण कृतज्ञ होण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.'

केनेथ अलेक्झांडर मिशेल यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला. तो एक कॅनेडियन अभिनेता होता. जो २०१७ आणि २०२१ दरम्यान स्टार ट्रेक: डिस्कव्हरीमध्ये विविध भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध झाला होता. अभिनेत्याच्या निधनानंतर स्टार ट्रेकने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलेकी, 'स्टार ट्रेकवर क्लिंगन्स कोल, कोल-शा आणि टेनाविक तसेच ऑरेलिओची भूमिका करणारे केनेथ अलेक्झांडर मिशेल यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. स्टार ट्रेक: लोअर डेक्सच्या एका भागामध्ये त्याने अनेक पात्रांना आवाज दिला. संपूर्ण स्टार ट्रेक परिवार मिशेलचे कुटुंब, मित्र, प्रियजन आणि जगभरातील चाहत्यांसाठी शोक व्यक्त करतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT