Salman Khan House Firing Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Baba Siddique Death: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने खळबळ उडाली असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असलेल्या बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई

Salman Khan Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने खळबळ उडाली असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असलेल्या बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई सोबतच शत्रुत्व संपवण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी करत खंडणी न दिल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था करु, अशा धमकीचा मेसेज वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअपवर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आल्याने सिनेविश्वात एकच खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई सोबतचे शत्रुत्व संपवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली असून खंडणी न दिल्यास बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था करु, असा इशारा असलेला मेसेज वाहतूक शाखेच्या वॉट्सअपवर प्राप्त झाला आहे. या धमकीच्या मेसेजनंतर पोलीस सतर्क झाले असून मेसेज पाठवणाऱ्याला ट्रेस करण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जिवाला धोका वाढला आहे. सलमान खानला वारंवार लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमक्या येत असून याच प्रकरणात सलमानचे जवळचे मित्र असलेले बाबा सिद्दीकी यांचीही हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारीही लॉरेन्स बिश्नोई गँगकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणानंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. अशातच आता धमकीचा मेसेज आल्याने सिनेविश्वात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकतीच हरियाणातील पानिपत येथून एका संशयिताला अटक केली. सुक्खा कालूयाला असे त्याचे नाव असून पनवेल शहर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. सलमान खान याच्या फार्म हाऊसची रेकी करणे आणि जीवे मारण्याची सुपारी घेतल्या प्रकरणी सुक्खा कालूयाला वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुक्खा कालूयाला हा बिष्णोई गँगचा शार्प शुटर असून तो अनेक महिन्यापासून फरार होता. आज सुक्खा कालूयाला पनवेल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT