Brahmastra  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Brahmastra : बॉयकॉट ट्रेंडमध्येही ब्रम्हास्त्र चालला! दुसऱ्याचं दिवशी १०० कोटी क्लबमध्ये समावेश

फक्त दोन दिवसात ब्रम्हास्त्रने १६० कोटींची कमाई करत इतिहास रचला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटाच्या रिलीजला दोन दिवस पूर्ण झाले आहेत. चित्रपटाला सुरुवातीला बायकॉट ट्रेंडला सामोरे जावे लागले. पण हा चित्रपट त्याच्या शीर्षकाप्रमाणेच बॉलिवूडचा ब्रह्मास्त्र म्हणून उदयास आला. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट बॉलिवूडमधील आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटाचे बजेट ४१० कोटी आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ११ वर्षांच्या मेहनतीचा परिणाम आता दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी जगभरात ७५ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही बऱ्यापैकी कमाई केली आहे.

ब्रह्मास्त्र या चित्रपटाने शनिवारी उत्तर भारत आणि गुजरातमध्ये चांगलीच कमाई केली. तर शुक्रवारी, सुमारे ३१ कोटींची कमाई फक्त हिंदीत झाली आणि अन्य भाषांमध्ये थोडीशी घसरण दिसून आली. आता दोन दिवसांच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने केवळ हिंदीमध्ये ३३ कोटींची कमाई केली आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या इतर भाषांमध्ये ३७ कोटींचा गल्ला जमा केला आहेत.

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी ७६ कोटींची कमाई केली. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या सिनेमाने जगभरात ८५ कोटींची कमाई करत १०० कोटींचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत फक्त दोन दिवसात १६० कोटींची कमाई करत या चित्रपटाने इतिहास रचला आहे.

आलिया आणि रणबीरचा चित्रपट रिलीज झाल्यापासून दोघेही आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तो पाहण्याची विनंती करत आहेत. या दोघांसाठी हा खूप खास क्षण आहे कारण दोघांनी काही महिन्यांपूर्वी लग्न केले आहे आणि आता लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. हा चित्रपट हिट होणं या दोघांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. 'ब्रह्मास्त्र'साठी दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत सगळेच प्रयत्न करत आहेत. बघूया चित्रपटाचे भविष्य किती उज्ज्वल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : मुंबईला आज पुन्हा रेड अलर्ट

Cheese Recipe : विकत कशाला? घरीच १० मिनिटांत बनवा हेल्दी चीज

Amitabh Bachchan : मुंबईत पावसाचा हाहाकार; बिग बींच्या बंगल्यातही शिरले पाणी, पाहा व्हायरल VIDEO

Mumbai Local Update : पावसाचा मुंबई लोकलला फटका; हार्बर, मध्य रेल्वे २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे मेगा हाल

Pune School Holiday: पुण्यातील घाटमाथ्याच्या शाळांना आज सुट्टी, परिसराला रेड अलर्ट; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT