Marathi Movie Boyz 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Boyz 3: 'बॉईज ३'ने घेतली कोटींची उड्डाणे; पहिल्या तीन दिवसांतच...

'बॉईज ३' चित्रपटाने तीन दिवसात तब्बल ३.०५ करोडचा लक्षणीय गल्ला जमवला आहे. सर्व तिकीट खिडक्यांवर 'बॉईज ३ हाऊसफ़ुल्ल'च्या पाट्याही पाहायला मिळत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'बॉईज' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अर्थात २०१७ पासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बॉईज ३'नेही काही काळातच बॉक्स ऑफिसवर काही करोडोंची कमाई केली आहे. केवळ तीन दिवसांतच 'बॉईज ३' ने एक नाही, दोन नाही तर तब्बल ३.०५ करोडचा लक्षणीय गल्ला जमवला आहे. सर्व तिकीट खिडक्यांवर 'बॉईज ३ हाऊसफ़ुल्ल'च्या पाट्याही पाहायला मिळत आहेत. सोबतच सिनेमागृहात प्रत्येक डायलॉगवर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सिनेमागृहाच्या बाहेर पडताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून एकंदर सिनेमा उत्तम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धैर्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाला किर्तीने दिलेली साथ प्रेक्षकांना विशेष आवडली असून या चित्रपटाला प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आणि समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त 'बॉईज ३' चा डंका वाजताना दिसत आहे. शाळेपासून सुरु झालेला बॉईजचा हा प्रवास आता महाविद्यालयापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्यांची धमालही आता तिप्पट झालेली आहे.

चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर सांगतो, " 'बॉईज'च्या दोन्हीही भागांनी प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करणे आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. मात्र यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली. 'बॉईज ३'ला प्रेक्षकांचा मिळणारा हा सकारात्मक प्रतिसाद पाहाता, आमच्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळत आहे. प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या या प्रेमामुळेच आम्ही 'बॉईज ४'ची घोषणा करीत आहेत. त्यामुळे आता ही धमाल चौपट होणार आहे.''

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर याने केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT