Ved Movie Box Office Collection Update Instagram @riteishd
मनोरंजन बातम्या

Ved Collection Day 18: बॉलिवूडलाही 'वेड' लावलं, रितेशच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरूच

रितेश- जेनेलियाच्या 'वेड' चित्रपटाने अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले. या चित्रपटाने अनेक बॉलिवूड चित्रपटांचेही रेकॉर्ड मोडित काढले आहे.

Chetan Bodke

Ved Collection Day 18: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा दिग्दर्शित 'वेड' चित्रपट प्रदर्शित होऊन 18 दिवस पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यापासूनच या चित्रपटाने ज्या प्रकारची कमाई केली आहे ते पाहून सर्वांनाच या कमाईवर विश्वास बसत नाही. हा चित्रपट ज्या वेगाने कमाई करत आहे, ते पाहता हा चित्रपट लवकरच ५० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

चित्रपट समीक्षक आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'वेड'चे कौतुक करत लिहिले होते की, 'वेड' या मराठी चित्रपटाने तिसर्‍या वीकेंडमध्ये उत्कृष्ट आकडेवारी नोंदवली आहे. या चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडमध्ये 6.80 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट या आठवड्यात 50 कोटींचा व्यवसाय करणार आहे. पठान प्रदर्शित होण्यापूर्वी 'वेड'ने 50 कोटींचा आकडा पार केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने 18 व्या दिवशी 85 लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या रिलीजच्या तिसऱ्या शुक्रवारी 1.35 कोटी रुपये, शनिवारी 2.72 कोटी रुपये आणि रविवारी 2.74 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण कमाई 48.51 कोटींवर गेली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'सैराट' चित्रपटाचे अनेक रेकॉर्ड लवकरच मोडणार आहे. 'सैराट' हा मराठी इंडस्ट्रीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. तर 'वेड' हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'वेड' हा चित्रपट १५ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, तर 'सैराट' हा ४ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला चित्रपट होता. 'सैराट'चे देशात बॉक्स ऑफिस कलेक्शन 110 कोटींवर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT