Sridevi Death Anniversary Instagram @boney.kapoor
मनोरंजन बातम्या

Sridevi Death Anniversary: बोनी कपूरने शेअर केला श्रीदेवीचा शेवटचा फोटो, नवरीसारखी सजली होती अभिनेत्री

२४ फेब्रुवारी २०१८ रोजी ५४ वर्षाच्या श्रीदेवची दुबईमध्ये निधन झाले.

Saam Tv

Sridevi's 5th Death Anniversary: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीचे निधन सर्वांसाठी एक धक्का होता. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी ५४ वर्षाच्या श्रीदेवची दुबईमध्ये निधन झाले. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी तिचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी यूएईमध्ये गेली होती. पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूरसोबत श्रीदेवी एक फोटो व्हायरल होत आहे.

श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. आज श्रीदेवीची 5 वी पुण्यतिथी आहे. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी त्यांच्या पत्नीचा शेवटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रीदेवी पती बोनी, मुलगी खुशी आणि काही नातेवाईकांसोबत दिसत आहे. श्रीदेवीने हिरवी साडी नेसली आहे आणि सोन्याचे पारंपरिक दागिने परिधान केले आहेत. या पेहरावात श्रीदेवी सुंदर दिसत आहे. श्रीदेवीची मुलगी खुशीने पेस्टल पीच लेहेंग्यात दिसत आहे.

बोनी कपूर गेल्या यांना काही दिवसांपासूनच पत्नीच्या आठवण शेअर करत आहेत. श्रीदेवीचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, '5 वर्षांपूर्वी तू आम्हाला सोडून गेलास... तुझे प्रेम आणि आठवणी आमच्या स्मरणात काय आहेत आणि नेहमी आमच्यासोबत राहतील...' इन्स्टाग्राम स्टोरीवर श्रीदेवीचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. तिथे त्यांनी लिहिले आहे, 'लाजरी, मितभाषी पण जेव्हा प्रेमात पडली तेव्हा...'

मुलगी जान्हवी कपूर देखील आई श्रीदेवीच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे, 'मला अजूनही सगळीकडे तुला शोधत असते आई, तुला माझ्या अभिमान वाटावा म्हणून तू जे करायची ते सर्व मी अजूनही करते. मी जिथे जातो आणि जे काही करते - ते तुमच्यापासून सुरू होते आणि तुझ्यावर संपते.'

श्रीदेवीनी तिच्या करिअरची सुरूवात बालकलाकार म्हणून केली होती. त्यानंतरव श्रीदेवीची बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांमध्ये अनेक दमदार कामगिरी करत सर्वांच्या मनावर अधिराज्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला संधी, कुणाला मिळाला डच्चू? IND vs UAE सामन्यात अशी आहे टीम इंडियाची Playing XI

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT