Sonakshi Sinha Luv And Kushal Sinha Relation Instagram
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha News : सोनाक्षीचं दोन्हीही भावांसोबत बिनसलं ? सुभाष घईंनी सिन्हा कुटुंबीयांसोबत शेअर केलेल्या फोटोपासून होतेय एकच चर्चा

Sonakshi Sinha Luv And Kushal Sinha Relation : दिग्दर्शक सुभाष घई यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तेव्हापासून सोनाक्षीच्या दोन्हीही भावांनी तिच्या सोबतचे संबंध तोडल्याची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत मुंबईमध्ये रजिस्टर मॅरेज केले. लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अभिनेत्रीच्या कुटुंबाकडूनही लग्नाला विरोध केला जात होता. पण तिच्या वडिलांनी नंतर लग्नाला सपोर्ट केला.

पण लव सिन्हा आणि कुशल सिन्हाने बहिणीच्या लग्नाला विरोध केला होता. तिने आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे तिच्या दोन्ही भावांनी संबंधच तोडल्याची चर्चा होत आहे. दिग्दर्शक सुभाष घई यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तेव्हापासून सोनाक्षीच्या दोन्हीही भावांनी तिच्या सोबतचे संबंध तोडल्याची चर्चा होत आहे.

९ जुलै रोजी शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक सुभाष घई यांनी सिन्हा फॅमिलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हापासून सोनाक्षीच्या दोन्हीही भावांनी तिच्या सोबतचे संबंध तोडल्याची चर्चा होत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये सुभाष घई आणि त्यांची पत्नी, शत्रुघ्न सिन्हा, पूनम सिन्हा, सोनाक्षी, झहीर आणि झहीरचे वडील दिसत आहेत. या फोटोत सोनाक्षीचे दोन्ही भाऊ दिसत नसल्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनची चर्चा होत आहे.

दरम्यान, सोनाक्षीने झहीरसोबत आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी आणि तिच्या दोन्हीही भावांनी लग्नाला विरोध केला होता. पण त्यानंतर वडिल शत्रुघ्न सिन्हा लग्नासाठी तयार झाले आणि त्यांनी लग्नाला उपस्थित लावून सोनाक्षी आणि झहीरला भावी आयु्ष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोनाक्षीच्या लग्नामध्ये, लव आणि कुश हे दोघेही गायब असल्याची चर्चा होती. लव सिन्हाने याचं खंडन केलं असलं तरी सोशल मीडियावर तो बहिणीला फॉलो करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 4th Test : टीम इंडियाला सलग दोन धक्के, लागोपाठ दोन स्टार खेळाडू संघातून बाहेर; गिलचं टेन्शन वाढलं

Saving Scheme : रोज करा १२१ रुपयांची बचत अन् मुलीच्या लग्नापर्यंत २७ लाख जमा होतील; कशी आहे LICची खास 'कन्यादान पॉलिसी'

Security Tips: तुमचे बँकिंग आणि सोशल अकाउंट 'असे' सुरक्षित ठेवा, सरकारने सांगितले महत्वाचे पासवर्ड टिप्स

White Colour Saree: श्रावणात सणासुदींला नेसा खास पांढऱ्या रंगाच्या मनमोहक साडी

Mira Road : घरी बोलावलं अन् डाव साधला, पायलटकडून २३ वर्षीय एअर हॉस्टेसवर बलात्कार; मीरा रोड हादरलं

SCROLL FOR NEXT