Famous Singer saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer : प्रसिद्ध गायकाच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार, बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; सिनेसृष्टीत खळबळ

Lawrence Bishnoi Gang : प्रसिद्ध गायकाच्या मॅनेजरच्या घरावर बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध गायकाच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार झाला.

गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली.

गोळीबारची घटना हरियाणात घडली.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh)च्या मॅनेजरच्या निवासस्थानी गोळीबाराची घटना घडली आहे. ही घटना हरियाणामधील गोंदर गावात घडल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड इंडस्ट्री धोक्यात आली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, बिश्नोईचे साथीदार टायसन बिश्नोई, आरजू बिश्नोई आणि हरी बॉक्सर यांनी म्हटले आहे की, हा हल्ला "ऑस्ट्रिया-निर्मित" शस्त्रांचा वापर करून करण्यात आला होता. हा गोळीबार केवळ एक इशारा म्हणून करण्यात आला. त्यामागे खंडणी उकळणे किंवा आर्थिक फायदा मिळवणे हा उद्देश नव्हता. तसेच या टोळीने असा आरोप केला आहे की, गायकाशी संबंधित असलेला एक कर्मचारी महिलांचे शोषण करत होता. त्यांनी दावा केला की, अलीकडेच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पंजाबमधील एका महिलेचा छळ करण्यात आला आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडून देण्यात आले.

पोस्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, गायकाच्या बँडशी संबंधित अशाच प्रकारच्या लज्जास्पद वर्तनाबाबत इतर अनेक महिलांकडून या टोळीला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दोसांझ आणि त्याचे मॅनेजर सोनाली आणि गुरप्रताप यांना यापूर्वीच दोन वेळा इशारे पाठवण्यात आले होते. त्यामध्ये, संबंधित आरोपी कर्मचाऱ्यापासून दूर राहण्यास त्यांना सांगण्यात आले होते.

बिश्नोई गँगने धमकी दिली आहे की, दोसांझ आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करतो, म्हणून आम्ही संयम ठेवला आहे. मात्र यापढे त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले, तर यापेक्षाही अधिक गंभीर कारवाई होईल. तसेच "आरोपीचे पितळ उघडे पाडण्याची" धमकी टोळीने दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT