हिंदी चित्रपट आणि संगीताच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. गेल्या १६ वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरलीय.
सुलक्षणा पंडित यांनी ७० आणि ८० च्या दशकात त्यांच्या मधुर आवाजाने आणि इमोशनल अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं. १९५४ मध्ये जन्मलेल्या सुलक्षणा पंडित एका प्रतिष्ठित संगीतकार कुटुंबातील होत्या. प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज त्यांचे काका होते. त्यांचे भाऊ, जतिन आणि ललित यांनीही प्रसिद्ध संगीतकार जोडी म्हणून प्रसिद्धी मिळवलीय. त्यांनी वयाच्या ९ व्या वर्षापासून गायनला सुरुवात केली होती. १९६७ मध्ये त्यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात प्रवेश केला होता.
'संकल्प' (१९७५) चित्रपटातील 'तू ही सागर है तू ही किनारा' या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन पुरस्कार मिळाला होता. गायिका असण्यासोबतच सुलक्षणा पंडित यांनी अभिनयातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. यात अभिनेता संजीव कुमार यांच्यासोबत "उलझन" (१९७५) आणि "संकोच" (१९७६) यांचा समावेश आहे.
सुलक्षणा पंडित यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य एकट्याने घालवले. संजीव कुमार यांच्यासोबतच्या अपूर्ण प्रेम कहाणीचा त्यांच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला असे म्हटले जाते. कामापासून दूर राहिल्यानंतर त्यांना विविध आजार आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.