Salman Khan And Sangita Bijlani Viral video Instagram
मनोरंजन बातम्या

Salman Khan Viral Video: अबब! भाईजानसोबत एक्स गर्लफ्रेंडने हे काय केलं, व्हिडीओ पाहून व्हाल शॉक

Salman Khan And Sangita Bijlani Viral video: संगीता आणि सलमानचा एक शॉकिंग व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Salman Khan Dance Viral video: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहेच, मात्र आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी. संगीता आणि सलमानचा एक शॉकिंग व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

नुकताच ईद निमित्त सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी आयोजित केलेल्या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काल संध्याकाळी पार पडलेल्या या पार्टीत सलमान, संगीता बिजलानी, कतरिना कैफसह इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स सहभागी झाले होते. या पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीतासोबत तो बाहेर जाताना दिसत आहे. (Bollywood News)

यादरम्यान संगीता सलमानसोबत असे करते, जे करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, सलमान बाहेर पडत असताना त्याच्या मागे संगीता बिजलानीही दिसते. दरम्यान, सलमान काहीतरी बोलतो आणि हसायला लागतो, यावर संगीता सलमानचे गाल ओढते आणि त्याच्या काना खाली मारण्याचा प्रयत्न करते. संगीताचे हे कृत्य पाहून सलमानलाही हसू आवरत नाही. (Bollywood Actor)

हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये दोघेही सलमान आणि संगीता एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहे. या दोघांचा ब्रेकअप झाला असला तरी सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्यातील मैत्री फार घनिष्ठ आहे.

आजही त्यांची बॉंडिंग खूप चांगली आहे. संगीता सलमानच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमातही दिसते. अलीकडेच या दोघांचा एक फोटो देखील बराच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांचा रोमँटिक अंदाज दिसून आला.

संगीता बिजलानी आणि सलमान खानच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून भन्नाट कमेंट्स येत आहेत. मुख्य बाब म्हणजे, संगीता बिजलानी आणि सलमान खान जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट करत होते. २७ मे १९९४ रोजी दोघेही लग्न करणार होते, पण नंतर हे लग्न तुटले आणि दोघेही कायमचे वेगळे झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neha Kakkar: नेहा कक्करचा व्हायरल लाबुबू डॉल लूक पाहिलात का?

Beed : ऑनलाइन जुगारात पैसे बुडवले, कर्ज फेडण्यासाठी पोलीस बनला चोर; पोलीस अधीक्षक कार्यालयात केली होती चोरी

Maharashtra Live News Update : साम टिव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट; नाशिक जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकाऱ्यावर कारवाई होणार

Ajit Pawar :...म्हणून विरोधकांनी मराठी भाषेचा मुद्दा काढला; अजित पवारांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

Maharashtra Assembly Session : कुणाला 'ओम फट् स्वा:हा' तर कुणाला 'चायनीज बिल्ली'; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं

SCROLL FOR NEXT