Rani Mukerji's Maternal Grandmother Passes Away:  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rani Mukerji: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीवर कोसळला दुःखाचा डोंगर

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची आजी आरती रॉय यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rani Mukerji's Maternal Grandmother Passes Away: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची आजी आरती रॉय यांचे मंगळवारी संध्याकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. आरती रॉय या ज्येष्ठ टॉलिवूड अभिनेत्री देबश्री रॉय यांच्या आई आहेत. राणी मुखर्जीची आई कृष्णा मुखर्जी या देबश्री यांच्या बहीण आहेत. गेल्या अनेक दिवसांपासूनआरती रॉय या आजारपणामुळे त्रस्त होत्या. गेल्या काही महिन्यांपासून आरती रॉय त्यांच्या मोठ्या मुलीसोबत राहत होत्या. आरती रॉय यांनी तिन्ही मुलींच्या उपस्थितीत अखेरचा श्वास घेतला असल्याचे देबश्री यांनी सांगितले आहे.

देबश्री यांनी त्यांच्या आईविषयी भावना व्यक्त केल्या, 'माझी आई माझ्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी मोठी प्रेरणा आहे. जेव्हा अभिनेते अरबिंदा मुखोपाध्याय यांच्या 1978 मध्ये आलेल्या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत पदार्पण केले तेव्हा संपूर्ण रॉय कुटुंबासाठी ते एक स्वप्न होते. सुरुवातीच्या काळात आईच मला चित्रपटाच्या शूटिंगला घेऊन जायची.'

'मी आईच्या समोर असतानाही तिचे निधन केव्हा झाले हे मला समजले नाही. आईमुळेच मी अभिनेत्री झाले. आरती यांना वृद्धापकाळामुळे झालेल्या आजाराशिवाय कोणतेही आजार नव्हते. आई तिच्या तीन मुलींच्यासमोरून निघून शांतपणे गेली. (Actress)

राणी मुखर्जीची आजी यांच्या ऑगस्ट 2022 मध्ये छोटासा अपघात झाला होता. त्या घरामध्ये पडल्या आणि त्यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली होती. त्या गंभीर जखमेतून त्यांचे खूप रक्त वाहून गेले होते. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेत असताना त्या बेशुद्ध पडल्या होत्या. आरती रॉय यांच्या जाण्याने रॉय कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Death)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT