Rakesh Roshan On Krrish 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakesh Roshan On Krrish 4: हृतिक रोशनच्या ‘क्रिश ४’ बद्दल मिळाली महत्वाची अपडेट; दिग्दर्शकांनी दिली मोठी माहिती...

‘क्रिश’ चित्रपटाच्या सिक्वेलची अनेकदा चर्चा झाली आहे. लवकरच हृतिक रोशन प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘क्रिश ४’ ची सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

Director Rakesh Roshan Gave Krrish 4 Film Update: बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून सर्वत्र फेमस असणार हृतिक रोशन कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी, व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. हृतिकला त्याच्या व्यावसायिक आयुष्यात ‘क्रिश’ चित्रपटामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ‘क्रिश’ चित्रपटाच्या सिक्वेलची अनेकदा चर्चा झाली आहे. लवकरच हृतिक रोशन प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘क्रिश ४’ ची सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे.

हृतिकचा ‘क्रिश ३’ २०१३ ला प्रदर्शित झाला होता. सध्या तेव्हापासून चित्रपटाच्या चौथ्या भागाची चर्चा होत आहे. मात्र, चित्रपटाच्या अधिकृत प्रदर्शनाच्या तारखेबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ‘क्रिश ४’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली नाही. दिग्दर्शकांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला ‘क्रिश ४’ बनवण्याची जास्त घाई नाही. २०२४ नंतर चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. सध्या त्याची टीम स्क्रिप्टवर काम करत असून, त्यानंतरच प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू होईल.”

सोबतच तो पुढे म्हणाला, कोणताही चित्रपट करण्यासाठी थोडा घ्यायला हवा. “मला ‘क्रिश ४’ चित्रपटासंबंधित कोणतीही घाई नाही. ‘क्रिश’ चित्रपटात जी संकल्पाना आहे, त्यावरच सर्वाधिक चित्रपट बनला आहे. चित्रपट हा नेहमी कथेवरच सर्वाधिक चालतो. चित्रपटाच्या विषयामुळे आणि कथेमुळे चित्रपटाच्या निर्मितीसाठी इतका वेळ लागत आहे.”

हृतिक रोशन नुकताच ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लवकरच हृतिक त्याच्या ‘वॉर २’ या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. सोबतच हृतिक सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात हृतिकसह दीपिका पदूकोण आणि अनिल कपूरही दिसणार आहेत. हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

SCROLL FOR NEXT