narendra modi special tribute to actor uttam kumar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Uttam Kumar: 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींना आली दिग्गज अभिनेत्याची आठवण; श्रद्धांजली वाहत सांगितला खास किस्सा

Uttam Kumar: उत्तम कुमार यांच्या १००व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे कौतुक केले. सत्यजित रे यांच्या ‘नायक’ चित्रपटाचाही त्यांनी उल्लेख केला.

Shruti Vilas Kadam

Uttam Kumar: बंगाली चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते उत्तम कुमार यांनी आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीवर वेगळी छाप पाडली. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे उत्तम कुमार आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या शानदार कारकिर्दीमुळे ते कायम स्मरणात आहेत. त्यांच्या १००व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३७व्या भागात उत्तम कुमार यांच्या कारकिर्दीचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी या ज्येष्ठ अभिनेत्याच्या अभिनयकौशल्याचे कौतुक करत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

PM मोदींनी केला उत्तम कुमार यांचा उल्लेख

‘मन की बात’मध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लवकरच म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्व उत्तम कुमार यांची १००वी जयंती साजरी केली जाणार आहे. उत्तम कुमार हे चित्रपटसृष्टीतील खऱ्या अर्थाने अष्टपैलू आणि दिग्गज कलाकार होते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले. उत्तम कुमार यांच्या अभिनयाचे उदाहरण देताना पंतप्रधान मोदी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या ‘नायक: द हिरो’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. चित्रपटप्रेमींच्या मते, या चित्रपटाची कथा विशेषतः उत्तम कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिण्यात आली होती. ही आठवण मन की बातमध्ये सांगण्यात आली.

२०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय

उत्तम कुमार यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृष्टिदान’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी बंगाली तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. रोमँटिक भूमिका असो किंवा गंभीर व्यक्तिरेखा, उत्तम कुमार यांनी प्रत्येक पात्राला आपल्या अभिनयाने वेगळी ओळख दिली. उत्तम कुमार यांच्या १००व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मेहनतीचे आणि अभिनयातील समर्पणाचे विशेष कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १८,६०० फूट उंचीवर भारतीय लष्कराच्या वैमानिकांचा थरारक पराक्रम; एकाच स्किडवर लँडिंग करत जखमीची केली सुटका

Railway Rules : स्टेशनवर थुंकण्यापूर्वी किंवा कचरा टाकण्यापूर्वी १० वेळा विचार करा! रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Soaked raisins: 30 दिवस रोज सकाळी खा पाण्यात भिजवलेले मनुके; होणारे फायदे वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

टिटवाळा स्थानकात १५ दिवसांचा मोठा मेगाब्लॉक! १५ दिवस लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार; अनेक गाड्या रद्द

Bank Holidays 2026: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँकांना सुट्ट्या, वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT