Bollywood Movie 2023 Saam TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Movie 2023: किंग खानचा 'जवान'ने जगभरात घातला धुमाकूळ, २०२३ मध्ये 'या' १० चित्रपटांनी कलेक्शमध्ये मारली बाजी

Bollywood Top 10 Movie Worldwide Collection: २०२२ च्या तुलनेत २०२३ हे वर्ष जगभरातील भारतीय चित्रपट उद्योगासाठी खूप चांगले ठरले. आज आपण या वर्षामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या १० चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत...

Priya More

Bollywood Top 10 Movie Collection:

2023 या वर्षाला संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण खूपच उत्सुक आहेत. बॉलिवूड (Bollywood) स्टार्सही नव्या वर्षाच्या (New Year) स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. 2023 हे वर्ष अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खूपच खास ठरले. या वर्षात अनेक बॉलिवूडच्या स्टार्सचे चित्रपट सुपरहिट ठरले असून त्यांनी चांगली कमाई देखील केली. काही चित्रपट असे ठरले आहे की या चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड मोडत इतिहास रचले आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ हे वर्ष जगभरातील भारतीय चित्रपट उद्योगासाठी खूप चांगले ठरले. आज आपण या वर्षामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या १० चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत...

जवान -

बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरले. या वर्षात शाहरुख खानचे ३ चित्रपट प्रदर्शित झाले. शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये दमदार कमाई केली. शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या 'जवान' चित्रपटाने जगभरात एकूण 1148.32 कोटींची कमाई केली.

पठान -

शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाने देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये जबरस्त कमाई केली. पठानने जगभरात 1050.3 कोटी रुपयांची लाइफटाइम कमाई केली.

ॲनिमल -

२०२३ हे वर्ष रणबीर कपूरच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरले. रणबीरने संदीप रेड्डी वंगासोबत पहिल्यांदाच 'ॲनिमल'मध्ये काम केले. ॲनिमल हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 882 कोटींची कमाई केली आहे.

गदर २ -

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर-एक प्रेमकथा' नंतर 22 वर्षांनी 'गदर 2'च्या माध्यमातून सनी देओल प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'OMG 2' सोबत टक्कर झाली. 'गदर 2' हा सनी देओलच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'गदर 2' ने जगभरात 691 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

लिओ -

थलपथी विजयचा 'लिओ' हा चित्रपटही या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. विजयचा हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला.'लिओ'ची जितकी क्रेझ भारतीय प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली तितकीच क्रेझ परदेशातही पाहायला मिळाली. या चित्रपटाने जगभरात 618 कोटींची कमाई केली.

जेलर -

रजनीकांत यांचा 'जेलर' 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. 'गदर 2' रिलीज होण्याच्या एक दिवस आधी 'जेलर' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात 605 कोटींची लाइफटाइम कमाई केली.

सालार -

प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' या चित्रपटातून प्रभासने कमबॅक केले. सालारने सात दिवसांत जगभरामध्ये 521.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट 'डंकी'ला टक्कर देत भरपूर कमाई करत आहे.

टायगर ३ -

2023 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तरीही, सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट जगभरात हिट ठरला. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये टायगर 3 चे नाव घेतले जाते. या चित्रपटाने जगभरात 466 कोटींचा व्यवसाय केला.

डंकी -

शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर 2023 वर्षाची चांगली सुरुवात केली होती आणि या वर्षाचा शेवट चाहत्यांसाठी स्मरणीय बनवण्याची जबाबदारी 'डंकी' द्वारे त्याने घेतली. 'सालार'च्या एक दिवस आधी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या किंग खानच्या 'डंकी'ने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 305 कोटींची कमाई केली आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानी -

या वर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचेही जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत नाव आहे. या चित्रपटात चाहत्यांना रणवीर आणि आलियाची जोडी दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळाली. या चित्रपटाने केवळ भारतातच चांगला व्यवसाय केला नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ स्पष्टपणे दिसून आली. या चित्रपटाने जगभरात 355 कोटींचा व्यवसाय केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा,पोलीस ठाण्याबाहेर आमनेसामने

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT