WWE Star John Cena Saam Tv
मनोरंजन बातम्या

WWE स्टार जॉन सीना निघाला Shah Rukh Khan चा फॅन, 'भोली सी सूरत' हे सुपरहिट गाणं गायलं; VIDEO व्हायरल

John Cena Viral Video: शाहरुख खानच्या चाहत्यांच्या यादीत एक नाव सामिल झाले आहे. WWE चॅम्पियन आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीना शाहरुख खानचा फॅन आहे. जॉन सीना अनेकवेळा शाहरुख खानचे कौतुक करताना दिसला आहे.

Priya More

WWE Star John Cena:

बॉलिवूडचा (Bollywood) 'बादशहा' अर्थात अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. आजही शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग म्हटले जाते यामागचे कारण म्हणजे आजही शाहरुख खान आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडवर राज्य करत आहे. त्याचा आजही कुठलाही चित्रपट प्रदर्शित झाला तर तो सुपरहिट ठरतोच. आजही शाहरुख खान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. शाहरुख खानचा फॅन फॉलोइंग खूप मोठा आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. शाहरुख खानचे चाहते सर्व सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत आहेत.

शाहरुख खानच्या चाहत्यांच्या यादीत एक नाव सामिल झाले आहे. WWE चॅम्पियन आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीना शाहरुख खानचा फॅन आहे. जॉन सीना अनेकवेळा शाहरुख खानचे कौतुक करताना दिसला आहे. आता जॉन सीनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो शाहरुख खानचे गाणे गाताना दिसत आहे. जॉन सीनाच्या या व्हिडिओला खूप चांगली पसंती मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

शाहरुख खानची लोकप्रियता जगभर पाहायला मिळते. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत. आता WWE चॅम्पियन आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो शाहरुख खानच्या 'दिल तो पागल है' या चित्रपटातील 'भोली सी सूरत' हे गाणं गाताना दिसत आहे. जॉन सीनाचा हा व्हिडिओ शाहरुख खानच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे.

2023 मध्ये शाहरुख खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आणि त्याने वर्चस्व गाजवले. शाहरुख खानने 2023 मध्ये एकापाठोपाठ तीन चित्रपट दिले. 'पठान', 'जवान' आणि 'डंकी' हे तीन चित्रपट रिलीज झाले. या हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. तसंच, या चित्रपटांनी फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये चांगली कमाई केली. 2024 मध्ये शाहरुख खानच्या कोणत्याही चित्रपटाची घोषणा अद्याप झालेली नाही. अशाप्रकारे शाहरुख खानच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT