मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या प्रेग्नंसीमुळं प्रचंड चर्चेत आहे. सध्या ती 'डार्लिंग' चित्रपटामुळंही चर्चेत असून, स्वतः ती खूप मेहनत घेत आहे. डार्लिंग्ज हा चित्रपट याच महिन्याच्या ५ तारखेला नेटफ्लिक्सवर रीलीज होत आहे. पण प्रदर्शनापूर्वी आलिया भट्ट ठिकाठिकाणी जाऊन आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करत असते. त्याचवेळी आलियानं एक मुलाखतीदरम्यान आपली 'मन की बात' केली. तिचा हा चित्रपट महिलांचं दुःख कशाप्रकारे मांडणार आहे, हे ती सांगण्याचा प्रयत्न करतेय. समाजात महिलांना खूप दबून राहावं लागतेय, असं ती म्हणाली.
आलिया भट्ट (Alia Bhatt) ही सध्या तिच्या डार्लिंग्ज (Darlings) चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच आलियानं एका मुलाखतीत आक्षेपार्ह टिप्पणीवर आपलं मत खुलेपणानं मांडलं. महिलांनी कसं राहायला हवं याचे सल्ले दिले जातात. समाजात महिलांना कशा प्रकारे चुकीच्या गोष्टींचा सामना करावा लागतो आणि इंडस्ट्रीतही सेक्सिज्म आहे, असंही ती म्हणाली.
महिलांना त्यांच्या ब्रा लपवायला सांगतात त्यावेळी राग येतो, अशा शब्दांत तिनं आपला संताप व्यक्त केला. ब्रा का लपवायला हवी? तेही कपडे आहेतच ना? पण पुरुषांना त्यांचे अंडरगारमेंट लपवावे लागत नाहीत. मला अनेकदा आक्षेपार्ह टिप्पणीचा सामना करावा लागला आहे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले, असेही ती म्हणाली.
आता मी आक्षेपार्ह कमेंटबाबत खूप विचार करते आणि या मुद्द्यावर मी जागरूक राहते. आता मला समजू लागलं की ती एक सेक्सिस्ट कमेंट होती. याबाबत मला माझे मित्र वारंवार सांगतात. तू इतकी सेन्सिटिव्ह होऊ नकोस असे ते म्हणतात. तुला पीरियड्स आलेत का? असं विचारलं जातं तेव्हा मी संवेदनशील नाही असे मी आता सांगते. महिलांना पीरियड्स येतात म्हणून तर तुम्ही जन्माला आलात ना? असा रोखठोक प्रश्न तिनं ट्रोलर्सना विचारला.
दरम्यानस, आलिया भट्ट सध्या 'डार्लिंग्ज' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हॉलिवूडमधील डेब्यू फिल्मशिवाय ती रणवीर सिंहसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि रणबीर कपूरसोबत ती 'ब्रह्मास्त्र'मध्ये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.