Tiger 3 Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Trailer Out: 'टायगर से दुश्मनी सबको भारी पडती हैं', सलमान-कॅटच्या 'टायगर ३' चा धमाकेदार ट्रेलर आऊट

Priya More

Tiger 3 Movie Trailer Released:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या आगामी 'टायगर ३' चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. टायगर ३ चा धमाकेदर ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

'टायगर ३' या चित्रपटाच्या माध्यमातून हे सुपर-स्पाय कपल टायगर आणि झोयाच्या भूमिकेत लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफचा या चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'टायगर ३'चा जबरदस्त ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा दिवाळीच्या मुहूर्तावर अॅक्शन आणि सस्पेन्स-थ्रिलरचे अप्रतिम मिश्रण घेऊन चित्रपटगृहात येण्यासाठी सज्ज झाला आहे. दिवाळीपेक्षा सलमान खानच्या चित्रपटात जास्त फटाके फोडले जाणार आहेत. सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर ३'चा ट्रेलर आज सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. सलमानसोबतच कतरिनाची अप्रतिम अ‍ॅक्शन ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये सर्वात जबरदस्त आहे ते म्हणजे या चित्रपटात विलनच्या भूमिकेत असलेल्या इमरान हाश्मीची एन्ट्री.

'टायगर ३'चा ट्रेलर सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर असे दिसून येते की, 'यावेळी अविनाश सिंगचे मिशन रॉ नसून वैयक्तिक असणार आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला एक महिला बोलताना दिसत आहे जी म्हणते की देशाची शांतता आणि त्याच्या शत्रूंमध्ये फक्त एका पुरुषाचे अंतर आहे. मग सलमान भिंत तोडून आत प्रवेश करतो आणि बाईक चालवतो आणि अनेक छतांवरून उड्या मारतो. बर्‍याच अ‍ॅक्शननंतर सलमान खान कॅटरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्यानंतर पार्श्वभूमीत इमरान हाश्मीचा आवाज येतो जो म्हणतो ' प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे कुटुंब.' अन् 'टायगर ३'ची कथा इथून सुरू होते.

सलमान खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर टायगर ३ चा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करत सलमान खानने कॅप्शनमध्ये 'टायगर से दुश्मनी सबको भारी पडती हैं. यावेळी पर्सनल असेल', असे लिहिले आहे. दरम्यान, हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. सलमान खान आणि कतरिना कैफशिवाय या चित्रपटात इम्रान हश्मी मुख्य भूमिकेत आहे. सलमान खानच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

हा चित्रपट येत्या १० नोव्हेंबर २०२३ रोजी म्हणजे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘एक था टायगर’चा हा ट्रायोलॉजी (तिसरा भाग) आहे. पहिला भाग ‘एक था टायगर’, दुसरा भाग ‘टायगर झिंदा हैं’ हा होता. हे दोन्ह भाग सुपरहिट ठरले होते. आता तिसरा भाग म्हणजे ‘टायगर ३’ रिलीज होणार असून हा भाग देखील सुपरहिट ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT