Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

58 वर्षांच्या Shah Rukh Khan ची बॉडी पाहून तरुणही लाजतील, शर्टलेस फोटो शेअर करत उडवून दिली खळबळ

Shah Rukh Khan Cool Look: शाहरुख खान आजकाल त्याच्या चित्रपटापेक्षा त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकताच शाहरुख खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केली आहे. त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

Priya More

Shah Rukh Khan Shirtless Photo:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच चर्चेत असतो. ५८ वर्षांचा शाहरुख खान आपल्या चित्रपट, फिटनेस आणि लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतो. या वयामध्ये देखील शाहरुख खान बॉलिवूडच्या आताच्या अभिनेत्यांना टक्कर देतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. त्यामुळे शाहरुख खान ज्या-ज्या ठिकाणी जातो तिथे त्याचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. शाहरुख खान आजकाल त्याच्या चित्रपटापेक्षा त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकताच शाहरुख खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केली आहे. त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

शाहरुख खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरुख खानचा पूर्णपणे वेगळ्या लूक दिसत आहे. शाहरुख खान त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे. या लूकमध्ये शाहरुख खान शर्टलेस दिसत आहे. शाहरुख खान त्याच्या नव्या लूकमध्ये खूपच कूल दिसत आहे. त्याचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चाहत्यांनी त्याच्या या लूकला चांगली पसंती दिली आहे.

शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन खानच्या कपड्यांचा ब्रँड D'Yavol X चे प्रमोशन करताना दिसत आहे. शाहरुख खानच्या शर्टलेस लूकसोबतच त्याने हातामध्ये घातलेल्या अंगठ्याही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. शाहरुख खानने शेअर केलेल्या पोस्टचे कॅप्शनही खूप मजेदार आहे. शाहरुख खानने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताच तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

शाहरुख खानचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडत आहे. शाहरुख खानच्या नव्या लूकवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'यार! मार ही डालो!' तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'फक्त एक हृदय आहे, तुम्ही किती वेळा जिंकणार'. याशिवाय अनेक यूजर्स किंग खानच्या लूकवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

दरम्यान, शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खूपच खास ठरले. त्याने २०२३ मध्ये बॉलिवूडला एकापाठोपाठ एक असे तीन चित्रपट दिले. त्याच्या 'पठान', 'जवान' आणि 'डंकी' या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. त्याच्या या चित्रपटांनी फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर जगभरामध्ये चांगली कमाई केली. हे चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर शाहरुख खान २०२४ मध्ये देखील धमाका करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र शाहरुख खानने त्याच्या पुढील चित्रपटाबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केला नाही. पण चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Shivali Parab: शिवालीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

SCROLL FOR NEXT