Jawan Box Office Collection  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jawan Box Office Collection Day 11: ५०० कोटींपर्यंत पोहचण्यासाठी इतक्या दूर आहे 'जवान', वर्ल्डवाइड कमाई ८०० कोटींपार

Jawan Worldwide Collection: रविवारी जवानने जी कमाई केली आहे त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की लवकरच हा चित्रपट ५०० कोटींपार कमाई करेल.

Priya More

Shah Rukh Khan Jawan Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा स्टारर 'जवान' चित्रपट (Jawan Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कामगिरी करत आहे. रिलीजच्या दिवशीच या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाचा कमाईच्या बाबतीत वेग मंदावला. पण दुसऱ्या आठवड्याच्या विकेंडला जवानने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे दिसून येत आहे. रविवारी जवानने जी कमाई केली आहे त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की लवकरच हा चित्रपट ५०० कोटींपार कमाई करेल.

शाहरुख खानचा 'जवान' दुसऱ्या रविवारी देखील ५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहचू शकला नाही. ५०० कोटींपर्यंत पोहचण्यासाठी या चित्रपटाला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४७५.७८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने 'गदर २' आणि 'केजीएफ' सारख्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर आधीच रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

जवानच्या जगभरातील कमाईबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटाने ११ दिवसांत ८०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने १० दिवसांत ७९७.१० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाची जादू अशीच कायम राहिली तर हा चित्रपट १००० कोटींपर्यंत कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. जर या चित्रपटाने १००० कोटींपर्यंत कमाई केली तर 'जवान' चित्रपट 'बाहुबली २' चा नक्कीच रेकॉर्ड ब्रेक करेल.

जवान चित्रपटात नयनतारा आणि शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण कॅमिओ भूमिकेत आहे. या चित्रपटात विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत किलर स्टाईलमध्ये दिसत आहे. या सर्वांव्यतिरिक्त सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, एजाज खान, संजय दत्त असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिथे उगारले कोयते, तिथेच पोलिसांनी आरोपींची काढली धिंड! पुण्यात औंध परिसरात दहशत माजवणाऱ्या सात जणांना अटक|VIDEO

Bharat Bandh: भारत बंदचा सर्वाधिक परिणाम कोणत्या राज्यात, कुठे काय परिस्थिती? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Live News Update :आमदार निवास कॅन्टीनमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) दाखल!

Poshan Aahar : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; पौष्टिक चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या

Guru Purnima Wishes: गुरुपौर्णिमा निमित्ताने आपल्या गुरुंना पाठवा 'हे' खास प्रेरणादायी शुभेच्छा

SCROLL FOR NEXT