Shah Rukh Khan Saam tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh khan News : शाहरुख खानला सरकारकडून Y+ सुरक्षा, ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनही सोबत असणार

Shah Rukh khan Security News : उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर शाहरुख खानची सुरक्षा Y+ करण्यात आली आहे.

सूरज सावंत

Mumbai News :

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला पठाण चित्रपटादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला सरकारने Y+ ची सुरक्षा पुरवली आहे.

याआधी शाहरुख खानला दोन पोलीस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. याशिवाय त्याच्यासोबत त्याचा स्वतःचा सुरक्षारक्षकही होता. मात्र आता उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर शाहरुख खानची सुरक्षा Y+ करण्यात आली आहे.

शाहरुख खानसोबत आता राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटच्या 6 प्रशिक्षित कमांडो नेहमी असतील. या कमांडकडे जे एमपी-5 मशीन गन, एके-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तूल असा शस्त्रासह हे कमांडो शाहरूखच्या सुरक्षेस तैनात असतील. (Latest Entertainment News)

तसेच शाहरुख खानच्या या सुरक्षेव्यतिरिक्त त्याच्या घरावर 24 तास शस्त्रांसह मुंबई पोलिसांचे 4 कर्मचारी पहारा देणार आहेत. याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव शाहरुख खान त्याच्या कारने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास निघेल, त्यापूर्वी ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनासह प्रशिक्षित कमांडो असतील.

जे वाहतूक सुरळीत करतील जेणेकरून कोणीही शाहरुख खानच्या गाडीच्या पुढे किंवा मागे येऊ नये. शाहरूखची गाडी ट्राफीकमध्ये अडकू नये, या अनुशंगाने ही व्यवस्था असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT